White Hair Problem : अकाली ‘केस पांढरे’ होण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवायचंय? कामी येतील ‘हे’ उपाय!

पांढऱ्या केसांवर उपाय: आजच्या काळात लहान वयातच केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. ही समस्या टाळण्यासाठी तुमची जीवनशैली आणि आहार सुधारण्यासोबतच तुम्ही काही उपाय करू शकता. जाणून घ्या, पांढऱया केसांवर घरगुती उपाय.

White Hair Problem : अकाली ‘केस पांढरे’ होण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवायचंय? कामी येतील ‘हे’ उपाय!
केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 8:35 PM

मुंबई : सध्याच्या काळात लहान वयातच केस पांढरे (White Hair) होण्याची समस्या सामान्य झाली आहे. तरूण वयात केस पांढरे झाल्याने, तुमचा संपूर्ण लुकच खराब दिसतो. ज्यामुळे तुम्ही वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागता. अशा परिस्थितीत लोक पांढरे केस लपवण्यासाठी मेंदी आणि किंवा रंग वापरतात. ज्याचे दुष्परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागतात. आजकाल बाजारात येणारी मेंदी ही केमिकलयुक्त (Henna is chemical) असते. ज्यामुळे तुमचे केस कोरडे होतात. त्याच वेळी, डाय तुमचे केस अधिक लवकर पांढरे करतात. अशा परिस्थितीत, या समस्येवर नियंत्रण (Control the problem) ठेवण्यासाठी, त्याचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून केस पांढरे होण्यापासून रोखता येईल. जाणून घ्या, केस पांढरे होण्याची कारणे आणि केसांना आवश्यक पोषण देण्यासोबतच पांढरे होण्यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरणारे सोपे उपाय.

पांढऱ्या केसांचे कारण

आजच्या काळात आपला चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली हे केस पांढरे होण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस्ड फूडच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत, त्यामुळे केसांची मुळे काळी पडणारे मेलेनिन रंगद्रव्य कमी होऊ लागते. याशिवाय झोप न लागणे, अति ताणतणाव, प्रदूषण आदींमुळे मेलेनिन रंगद्रव्यावरही परिणाम होतो. त्यामुळे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात.

हे उपाय उपयोगी येऊ शकतात

कढीपत्ता : कढीपत्ता केसांसाठी खूप चांगला मानला जातो. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी आणि ते दीर्घकाळ काळे ठेवण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते. तुम्ही कढीपत्त्याची पेस्ट बनवून केसांना लावू शकता. यासाठी कढीपत्ता धुवून बारीक करावा. या पेस्टमध्ये दही मिसळा आणि केसांना लावा. साधारण अर्धा तास तसंच राहू द्या. त्यानंतर केस धुवावेत. हे आठवड्यातून दोनदा करा. यामुळे तुमचे केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबेल.

बटाट्याची साले : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही अनेकदा कचर्‍यात टाकलेल्या बटाट्याच्या सालीचा तुम्हाला खूप उपयोग होतो. यासाठी बटाट्याची साले एक कप थंड पाण्यात अर्धा तास ठेवा. यानंतर पाणी उकळा आणि थोडा वेळ मंद आचेवर शिजवा. थंड झाल्यावर हे पाणी केसांना लावून मसाज करा. साधारण दोन तास केस असेच राहू द्या. त्यानंतर केस धुवावेत. असे आठवड्यातून दोनदा केले तर खूप फरक दिसेल.

या गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी या उपायांसोबतच काही गोष्टींचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.

  1. तणावापासून दूर राहा. यासाठी नियमितपणे योगा आणि ध्यान करा.
  2. आठ तासांची पूर्ण झोप घ्या. यासाठी वेळेवर झोपण्याचा आणि सकाळी उठण्याचा नियम करा.
  3. आहारात हिरव्या भाज्या, फळे, रस, अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करा आणि जंक फूड, फास्ट फूड किंवा कोणत्याही प्रकारच्या बाहेरील अन्नापासून दूर रहा.
  4. पॅकबंद वस्तू खाणे आणि अशी पेये पिणे टाळा.
  5. उदासीनता किंवा प्रतिजैविकांचा वापर कमी करा.
  6. केसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडतांना केस कापडाने झाकून ठेवा.

(या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे अनुसरण करा.)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.