रोज किती मीठ खायचं?; जागतिक आरोग्य संघटनेकडून गाइडलाईन जारी !

अन्नामध्ये कितीही वेगळ्या प्रकारचे मसाले घाला. मात्र, जोपर्यंत आपण अन्नामध्ये मीठ घालत नाहीत.

रोज किती मीठ खायचं?; जागतिक आरोग्य संघटनेकडून गाइडलाईन जारी !
मीठ

मुंबई : अन्नामध्ये कितीही वेगळ्या प्रकारचे मसाले घाला. मात्र, जोपर्यंत आपण अन्नामध्ये मीठ घालत नाहीत. तोपर्यंत अन्न चवदार बनत नाही. मात्र, अनेक लोक मीठ जास्त प्रमाणात खातात. बरेच आरोग्य तज्ज्ञ मीठ कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला देखील देतात. कारण जास्त मीठ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. (WHO releases guidlines for eating Sodium aka salt per day)

शिवाय मीठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनेक आरोग्याने निमंत्रण मिळते. नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेनेही मीठ खाण्याविषयी काही मार्गदर्शक सुचना जाहिर केल्या आहेत. WHO च्या मते एका दिवसात 5 ग्रॅम मीठ आपल्या शरीराला पुरेसे आहे.

हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका
आपल्या शरीराला सोडियम आणि पोटॅशियम दोन्ही आवश्यक आहेत. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील जास्त सोडियम बाहेर पडते आणि पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण असमतोल होते. सोडियमच्या अधिकतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि उच्च बीपी होते. यामुळे ब्रेन स्ट्रोक, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका तसेच मूत्रपिंडावर त्याचा वाईट परिणाम होण्याचा धोका आहे.

5 ग्रॅम मीठ शरीराला पुरेसे
WHO च्या मते, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात सोडियमची आवश्यकता पाच ग्रॅम मीठाने पूर्ण होते. परंतु आपल्यापैकी बरेच जण दिवसभरात सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात. WHO च्या अभ्यासानुसार सर्वाधिक प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड, डेअरी आणि मांसमध्ये मीठ आढळले. WHO च्या म्हणण्यानुसार, मीठ समतोल प्रमाणात खाल्ल्यास जवळपास अडीच दशलक्ष मृत्यूंना आळा बसेल.

कोणत्या आहारात सोडियम पुरेसे आहे?
WHOच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 100 ग्रॅम बटाटा चिप्समध्ये 100 ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम असू नये. तसेच प्रक्रिया केलेल्या मांसमध्ये 30 मिलीग्राम पर्यंत सोडियम पुरेसे आहे. मीठाचे सेवन शरीरासाठी देखील महत्वाचे आहे. हे शरीर हायड्रेट करण्याचे कार्य करते. सिस्टिक फायब्रोसिसची लक्षणे सुधारते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य योग्य प्रकारे करण्यास मदत करते. हे कमी बीपी असलेल्या रूग्णांसाठीही फायदेशीर आहे. पण आवश्यकतेनुसार ते खावे. जास्त मीठ आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(WHO releases guidlines for eating Sodium aka salt per day)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI