AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारूचे पेग 30, 60 किंवा 90 मिलीलीटरचेच का असतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण

दारू पिणारे लोक अनेकदा 30, 60 किंवा 90 मिलीलीटरच्या 'पेग'चा उल्लेख करतात. पण हे माप असेच का ठरवले गेले, हे अनेकांना माहीत नसते. चला, यामागील सोपे गणित, आरोग्य आणि इतिहासाचे रहस्य जाणून घेऊया.

दारूचे पेग 30, 60 किंवा 90 मिलीलीटरचेच का असतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण
pegsImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Aug 08, 2025 | 5:46 PM
Share

दारू पिणाऱ्यांच्या तोंडून तुम्ही ‘एक पेग बनव’ असं अनेकदा ऐकलं असेल. दारू पिणारे लोक आपापल्या क्षमतेनुसार पेग बनवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, हे पेग 30, 60 किंवा 90 मिलीलीटरचेच का असतात? यामागचं कारण नेमकं काय आहे? चला, या प्रश्नाचं उत्तर आणि ‘पेग’ या शब्दाचा इतिहास जाणून घेऊया.

दारूचे माप 30 आणि 60 मिलीलीटर का असते?

सोपे गणित: बहुतेक दारूच्या बाटल्या 750 मिलीलीटरच्या असतात. अशा बाटल्यांचा हिशेब ठेवण्यासाठी 30 आणि 60 मिलीलीटरचे पेग बनवणे सोपे असते. बारटेंडरला बाटलीतून किती दारू वापरली आहे, हे पटकन कळते.

क्षमतेनुसार: 30 मिलीलीटरचा पेग अशा लोकांसाठी असतो, ज्यांना हलकं व्यसन हवं असतं. ही एक अशी आदर्श मात्रा आहे, जी लोक हळू-हळू पिऊ शकतात आणि शरीराला ती पचायलाही सोपी असते. जास्त प्रमाणात न प्यायल्याने किडनी आणि लिव्हर यांना कमी हानी पोहोचते.

पटियाला पेग: काही लोक जास्त पिण्याची क्षमता ठेवतात, त्यांच्यासाठी 90 मिलीलीटरचा पेग बनवला जातो. यालाच ‘पटियाला पेग’ असेही म्हणतात.

‘पेग’ हा शब्द कुठून आला?

‘पेग’ या शब्दाची नेमकी उत्पत्ती कुठे झाली, याबद्दल ठोस माहिती नाही. पण असं मानलं जातं की, हा शब्द युनायटेड किंगडममध्ये (United Kingdom) खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांशी संबंधित आहे. त्यांना संध्याकाळी जी दारू दिली जायची, तिला ‘प्रिशियस इव्हनिंग ग्लास’ (Precious Evening Glass) असं म्हणायचे. याच ‘प्रेशियस इव्हनिंग ग्लास’ वरून ‘पेग’ हा शब्द आला असावा.

भारतात आगमन: भारतात हा शब्द ब्रिटिशांसोबत आला आणि हळूहळू भारतीय संस्कृतीचा भाग बनला. आज भारत आणि नेपाळ हे असे दोनच देश आहेत, जिथे दारूचे माप ‘पेग’ या नावाने मोजले जाते.

जगभरात दारूचे माप कसं घेतात?

जगभरात दारूचे माप मोजण्यासाठी अनेक विविध पद्धती आहेत, पण ‘पेग’ हा शब्द फक्त भारत आणि नेपाळमध्येच प्रचलित आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये दारूचे माप शॉट किंवा सिंगल , डबल या नावांनी मोजले जाते. ‘सिंगल’ म्हणजे 1.5 औंस (सुमारे 44 मिलीलीटर), तर ‘डबल’ म्हणजे 3 औंस (सुमारे 88 मिलीलीटर) असते.

अशा प्रकारे, आपल्या रोजच्या जीवनातील अनेक गोष्टींचा संबंध जुन्या प्रथा आणि परंपरांशी जोडलेला असतो, ज्याची आपल्याला सहसा कल्पना नसते.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.