AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात केस गळती का वाढते? त्यामागील ‘या’ मिथकांवर ठेवू नका विश्वास

आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. त्यात ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसून येते. तर अशा परिस्थितीत केस गळतीबद्दल अनेक मिथक आहेत ज्यावर अनेकजण आंधळेपणाने विश्वास ठेवतात, तर या लेखात केस गळतीच्या समस्येशी संबंधित काही गैरसमज आहेत ते जाणून घेऊया.

उन्हाळ्यात केस गळती का वाढते? त्यामागील 'या' मिथकांवर ठेवू नका विश्वास
केस गळतीImage Credit source: Boy_Anupong/Moment/Getty Images
| Edited By: | Updated on: May 28, 2025 | 3:12 PM
Share

बदलती जीवनशैली आणि बदलते हवामान यामुळे यासर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. एवढेच नाही तर यांचा परिणाम आपल्या केसांवर देखील होत आहे. कारण उन्हाळ्यात केस गळतीचे प्रमाण जास्त असते हे तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल. या दिवसांमध्ये तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि घामामुळे यांचा परिणाम आपल्या केसांवर होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, ज्यामुळे धुळीमुळे आपले स्कॅल्प ओले आणि खराब होऊ शकते. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळू लागतात. त्यातच सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे केस कोरडे होतात आणि खराब होतात आणि यामुळे केस गळण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

उन्हाळ्यात केस गळतीबद्दल अनेक गैरसमज आहेत, ज्यावर लोकं सहसा विश्वास ठेवतात आणि त्यांना वाटते की त्यांचे केस यामुळे गळत आहेत. केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे अनहेल्दी खाण्याच्या सवयी आणि केसांवर कोणत्याही प्रकारच्या प्रोडक्टचा वापर करतात.

केस गळतीशी संबंधित काही गैरसमज

केसांना तेल लावल्याने केस गळती थांबते

केसांना तेल लावल्याने स्कॅल्प कोरडे पडत नसल्याकारणाने केस गळण्याची समस्या उद्भवत नाही असे जर तुमचे म्हणणे असेल तर ते पूर्णपणे चुकीचे ठरेल. जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल, तर केसांचे तेल बदलण्यापूर्वी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. फक्त केसांचे तेल बदलल्याने तुमचे केस गळणे थांबणार नाही.

केसांना तेल लावल्याने कोंडा कमी होतो

केसांना तेल लावणे हे केसांच्या कंडीशनिंगसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत करू शकते. केसांची तेले केसांच्या वाढीला चालना देऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की गळणारे केस परत वाढतील किंवा कोंडा निघून जाईल. ही देखील एक मिथक आहे.

केस घट्ट बांधून झोपल्याने केस गळती थांबते

केस घट्ट बांधून किंवा वेणी घालून झोपल्याने केस गळती थांबते या गोष्टीत अजिबात तथ्य नाही. तुम्हाला केस उघडे ठेवून झोपायचे की वेणी बांधून झोपायचे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही तुमचे केस तुम्हाला हवे तसे ठेवू शकता. तर केसांना घट्ट वेण्यांमध्ये बांधल्याने मुळे कमकुवत होतात ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि केस मुळापासून तुटण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो रात्री झोपताना घट्ट वेणी बांधून झोपू नये.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.