Wedding Style | लग्नात काय घालायचं प्रश्न पडलाय, ‘हे’ आहेत काही हटके पर्याय

लग्न म्हटलं की कोणते कपडे घालायचे हा मोठा प्रश्न आपल्याला पडतो. (Winter Wedding style Lehenga)

Wedding Style | लग्नात काय घालायचं प्रश्न पडलाय, 'हे' आहेत काही हटके पर्याय

मुंबई : तुळशीचं लग्न झालं की आपल्याकडे लग्नाचा सिझन चालू होतो. लग्न म्हटलं की कोणते कपडे घालायचे हा मोठा प्रश्न आपल्याला पडतो. त्यात एखाद्या जवळच्या नातेवाईकाचं किंवा मित्राचं लग्न असेल तर मग हा प्रश्न अधिकच सतावत राहतो. जर तुमच्या घरातील लग्न असेल तर त्यासाठी मेहनत आणि तयारी दोन्ही करावी लागते. पण तेच एखाद्या मित्राचं लग्न असेल, तर मग कपडे, मेकअप, ज्वेलरी यावर विशेष लक्ष द्यावं लागतं. (Winter Wedding style Lehenga)

थंडीच्या दिवसात लग्न सभारंभाला काय घालायचे, असा प्रश्न महिलांना नेहमी पडलेला असतो. जर तुम्हाला लग्नात काही हटके पण पारंपारिक लूक करायचा असेल, तर तुम्ही बॉलिवूड सेलिब्रेटींच्या टिप्सचा नक्की वापर करु शकता.

पारंपारिक लेहंगासोबत हायनेक स्वेटर

जर तुम्हाला तोच तोच लेहंगा घालून कंटाळा आला असेल, तर तुम्ही एखाद्या प्रिंटेड लेहंग्यासोबत टर्टल हायनेक स्वेटर परिधान करु शकता. यामुळे पारंपारिक आणि हटके लूक आरामात मिळतो. त्यासोबत तुम्ही छान ट्रेडीशनल ज्वेलरी घातली, तर त्या लूकला चार चांद लागतील.

डेनिम जॅकेट विथ लेहंगा 

कित्येकदा एखादा लेहंगा किंवा भरजरी ड्रेस खराब झाला तर आपण तो फेकून देतो. पण त्या लेहंग्याला मॅच करणार एखादे डेनिम जॅकेट घालू शकता. तसेच एखादे वेलवेट प्रकारातील ब्लेझर वापरु शकता. अनेक कलाकार अशाचप्रकारे लग्नात एखादा हटके लूक करतात.

जर तुम्ही एखादा रंगेबेरंगी लेहंगा घातला असेल, तर त्यावर सिंपल जॅकेट घातल्यावर छान लूक येतो. जर तुम्ही एखादा भरजरी लेहंगा घातला असेल तर तुम्ही त्यावर डेनिम जॅकेट घालू शकता.

जॅकेट लेहंगा 

लग्नसभारंभात तुम्ही तेच तेच कपडे घालून कंटाळला असाल, तर तुम्ही जॅकेट लेहंगा ट्राय करु शकता. जॅकेट लेहंगा हा रॉयल लूक तर देतोच शिवाय थंडीपासूनही संरक्षण करतो.  (Winter Wedding style Lehenga)

संबंधित बातम्या : 

PHOTO : अनन्याजवळ आता नवे कपडे नाहीत, जीम बंद करण्यामागे सांगितलं ‘हे’ कारण

शौक बडी चीज है! बर्गर खाण्यासाठी गर्लफ्रेण्डसह दोन लाखांची हेलिकॉप्टरवारी