वर्कींग वुमननी या वस्तू बॅगेत ठेवायलाच हव्यात, इमर्जन्सीत येतात कामी

बाहेर जाताना प्रत्येकजण पैसे ,चावी, रुमाल, कंगवा आणि कागदपत्रे सोबत घेतो, परंतु तुम्ही वर्कींग वुमेन आहात किंवा कॉलेजला जाणाऱ्या तरुणी, तुम्हाला तुमच्या पर्समध्ये काही मुलभूत गोष्टी ठेवाव्यात लागतात. पाहूयात कोणत्या आहेत त्या वस्तू ?

वर्कींग वुमननी या वस्तू बॅगेत ठेवायलाच हव्यात, इमर्जन्सीत येतात कामी
woman holding leather handbagImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 4:25 PM

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण घरातून निघताना अनेक महत्वाच्या वस्तू आपल्या सोबत बॅगेत घेत असतो. परंतू महिलांना प्रवास करताना त्यांच्या सोबत बॅगेत काही वस्तू असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही कॉलेज किंवा ऑफीस जात असाल तर तरुणीच्या पर्समध्ये या वस्तू असणे हल्ली खूपच गरजेचे बनले आहे. यातील अनेक वस्तू तुम्हाला अडचणीत कामी येतील तर काही वस्तू तुमच्या सुरक्षेसाठी देखील महत्वाच्या असतात. महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अर्थाजन करीत आहेत. त्यामुळे समाजात वावरताना या वस्तू खूपच गरजेच्या बनल्या आहेत. त्यामुळे अडीअडचणीत तुम्हाला कोणाच्याही मदतीची आवश्यकता राहणार नाही.

सेफ्टी पिन सोबत ठेवा –

तरुण मुलींनी आपल्या बॅगेत नेहमी सेफ्टी पिन ठेवली पाहीजे. अनेकदा लोकल किंवा बस प्रवासात आपले कपडे उसवू शकतात, त्यामुळे सेफ्टी पिनचे एक पाकिट कायम सोबत असावे. कारण असे कपडे उसवल्याने आपल्यावर चारचौघात ओशळवाणे वाटू शकते. तसेच सेफ्टी पिनचा वापर आपल्या संरक्षणसाठी किंवा अन्य गोष्टीसाठी देखील करता येतो.

सॅनेटरी नॅपकिन किंवा टॅम्पोन बाळगावा –

मुलींनी त्यांच्या पर्समध्ये नेहमी एक्स्ट्रा सॅनिटरी नॅपकीन ठेवावी. टॅम्पोन किंवा मॅस्टुअल कप देखील ठेवावा, आपण स्वत:ला किंवा मैत्रिणीला किंवा सहकाऱ्यांना त्याची गरज लागू शकते.

स्कार्फ किंवा दुपट्टा देखील आवश्यक

हल्ली अनेक तरुणींच्या पेहरावात बदल झाला आहे. त्यामुळे ओढणी किंवा दुप्पटा कोणी वापरत नाही. तरही तुमच्याजवळ स्कार्फ किंवा दुपट्टा तरी असायलाच हवा. जरुर असल्यावर तुम्ही स्कार्फचा वापर ऊन्हापासून संरक्षणसाठी करु शकता. आणि आपल्या ड्रेसला नवा लूक देऊ शकता.

चिली स्प्रे स्वसंरक्षणासाठी येईल कामी

मुलीना एकाकी पाहून अनेक टवाळखोर छेड काढण्यासाठी अनेक शहरात आणि गावात टपलेलेच असतात. अशा वेळी चिली स्प्रे तुमच्या संरक्षणासाठी खूपच फायदेशीर असतो. संकटात हा स्प्रे शुत्रूच्या डोळ्यात मारला कि काम तमात होते. तुम्ही पळून जाऊ शकता.

क्लॅचर किंवा रबर बँड किंवा लिप बाम

सध्या बहुमतांशी मुली नोकरी करुन आपल्या संसाराला किंवा आई-वडीलांना  मदत करीत असतात. वर्किंग वुमनने यासाठी काही वस्तू बॅगेत किंवा पर्समध्ये नक्की ठेवाव्यात,बॅगेसत एक क्लेचर रबर बँड, लिप बाम आणि मॉश्चरायजर ठेवणे गरजेचे आहे.या काही बेसिक वस्तू आहेत.तुम्ही याहून अधिक तुमच्या गरजे प्रमाणे पर्समध्ये ठेवू शकता. ज्या वस्तू तुम्हाला किमान फ्रेश लुक देण्यासाठी मदतगार होतील.

विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण.
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.