AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यातील चिपचिप त्रासदायक ? तेलकट त्वचेवर लावा या गोष्टी अन् पहा कमाल

पावसाळ्यात वातावरणात कितीही गारवा आला तरी तेलकट त्वचेचे प्रश्न अजूनच वाढतात. ही समस्या सोडवण्यासाठी त्वचेवर काही पदार्थ लावणे फायदेशीर ठरते.

पावसाळ्यातील चिपचिप त्रासदायक ? तेलकट त्वचेवर लावा या गोष्टी अन् पहा कमाल
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 06, 2023 | 5:26 PM
Share

Oily Skin In Monsoon : पावसाळ्यात वातावरणात गारवा येतो, मजा-मस्तीचे दिवस असतात. पण तेलकट त्वचा (oily skin) असणाऱ्यांसाठी हा ऋतू आणखीनच त्रासदायक ठरतो. या ऋतूत आर्द्रता वाढल्याने त्वचेचे प्रॉब्लेम (skin problem) आणखी वाढतात. विशेषत: तेलकट त्वचा असणाऱ्यांची समस्या आणखी वाढते. स्किन पोर्स वाढते, त्यामुळे त्वचेतील सीबम वाढते आणि त्वचेवर, चेहऱ्यावर चिप-चिप, पिंपल्स, मुरुमं, ब्लॅकहेड्स (blackheads) अशा समस्यांचा मारा होतो.

तेलकट त्वचेमुळे चेहरा खूप निस्तेज दिसू लागतो. तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी बहुतांश लोक विविध स्किन केअर आणि सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. पण काही वेळा त्यांचाही विशेष फायदा होत नाही. तसेच त्यातील हानिकारक रसायने देखील आपल्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. मग पावसाळ्यात त्वचेला लावायचं तरी काय, असा प्रश्न सर्वांना पडतो.

पावसळ्यात तेलकट त्वचेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपायांचा वापर करू शकता. त्यामुळे केवळ चिपचिप दूर होत नाही तर त्वचा चमकदारही होते. अशा वेळी कोणत्या गोष्टींचा वापर करावा, ते जाणून घेऊया.

  1. मुलतानी माती आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. ती त्वचेतील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय, त्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग दूर होण्यासही मदत होते. त्यासाठी एका भांड्यात २ चमचे मुलतानी माती घ्या. त्यात पाणी किंवा गुलाबजल घालून मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वाळू द्या. 15-20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा अतिशय स्वच्छ आणि चमकदार होईल. नियमित वापराने फरक दिसून येईल.
  2. काकडीचा उपयोग केवळ खाण्यासाठी नव्हे तर त्वचेसाठीही होतो. त्यातील कूलिंग घटकामुळे त्वचेचे इरिटेशन, जळजळ, शांत होण्यास मदत होते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही काकडीचे घटक असलेल्या टोनरचा वापर करू शकता. यासाठी काकडी बारीक करून त्याचा रस काढा. नंतर त्यात थोडा लिंबाचा रस घाला. आता ते मिश्रण स्प्रेच्या बाटलीत ठेवा. चेहरा धुतल्यानंतर हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे तुमची त्वचा खूप फ्रेश आणि ग्लोइंग वाटेल.
  3. त्वचेच्या समस्यांसाठी बेसन हे रामबाण औषधापेक्षा कमी नाही. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. बेसन चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि त्वचेला एक्सफोलिएट करते. यामुळे मुरुमे, ब्लॅकहेड्स आणि काळे डाग यांचा त्रास कमी होतो. तुम्ही तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही बेसन आणि दही यांचा फेस पॅक लावू शकता. यासाठी एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या. त्यात २ चमचे दही घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा व मानेवर लावून थोड्या वेळाने धुवून टाका.
  4. कोरफडीचे औषधी गुणधर्म आणि फायदे हे सर्वांनाचा माहीत आहे. केस, त्वचा, सर्वांसाठीच तिचा वापर उपयपक्त ठरतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठीही कोरफड खूप फायदेशीर आहे. त्याच्या वापराने त्वचा मॉयश्चराइज तर होतेच पण पीएच संतुलनही राखले जाते. तसेच, त्वचेला नैसर्गिक चमकही येते. त्यासाठी कोरफडीचा पान कापून त्याचा गर काढावा. त्यामध्ये चिमूटभर हळद मिसळा. या दोन्ही गोष्टी नीट मिसळल्यानंतर चेहऱ्याला लावा. साधारण अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्ही याचा दररोजही वापर करू शकता.
  5. ओट्स हे काही फक्त खाण्यापुरतेच मर्यादित नाहीत तर ते आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर असतात. तेलकट त्वचेमुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी ओट्सचा वापर गुणकारी ठरतो. हे त्वचेवर उपस्थित अतिरिक्त तेल आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. चेहऱ्यावर ओट्स लावल्याने पिंपल्स आणि डार्क स्पॉट्सची समस्याही कमी होऊ शकते. यासाठी गरम पाण्यात 2-3 चमचे ओट्स टाकून 10 मिनिटे भिजू द्यावे. त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध घालून पेस्ट तयार करा व हा पॅक चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी लेप वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.