भंडारा-गोंदिया लोकसभा : भाजपकडे तगड्या उमेदवाराची वाणवा

भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा पाठिंबा घेत आहे. आता नंबर आहे तो भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा. नाना पटोले यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली, त्यामध्ये हा मतदारसंघ चर्चेत आला होता. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तुमसर, भंडारा, साकोली, तिरोडा, मोरगाव अर्जुनी या जागा भाजपच्या ताब्यात […]

भंडारा-गोंदिया लोकसभा : भाजपकडे तगड्या उमेदवाराची वाणवा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा पाठिंबा घेत आहे. आता नंबर आहे तो भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा. नाना पटोले यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली, त्यामध्ये हा मतदारसंघ चर्चेत आला होता. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तुमसर, भंडारा, साकोली, तिरोडा, मोरगाव अर्जुनी या जागा भाजपच्या ताब्यात आहेत. गोंदियाची जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे. तुमसरचे चरण वाघमारे, भंडाऱ्याचे रामचंद्र अवसरे, साकोलीचे बाळा काशिवार, अर्जुनी मो. चे राजकुमार बडोले तिरोडाचे विजय रहांगडाले आणि काँग्रेसचे गोपाल अग्रवाल असे सहा आमदार आहेत.

गोंदिया-भंडाराची निवडणूक नेहमीच जातीय समीकरणावर लढवली जाते. या लोकसभा मतदारसंघात तेली, कुणबी, पोवार आणि बौद्ध जातीचे प्राबल्य आहे. मतदानावर याचा प्रभाव पडतो, किंबहुना राजकारणाचे गणितच जातीवर अवलंबून आहे. स्थानिक मुद्दे गौण आहेत. येथील निवडणुकांमध्ये सध्या भाजपला यश मिळत आहे. मात्र काँग्रेसनेही स्वतःचे अस्तित्व कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या वर्चस्वामुळे या क्षेत्रात काँग्रेस मागे पडली आहे.

आता नाना पटोले यांनी भाजपातून राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यापासून काँग्रेसला किती फायदा होईल हे पुढे दिसेल. भारिप, आरपीआय आणि काँग्रेस यांचा नेहमी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा असल्यामुळे प्रमुख लढत ही भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारातच होत असते.  या निवडणुकीत बसपाला नेहमी मतदान तिसऱ्या क्रमांकावर असले तरी अनुसूचित जातीतील गटबाजीच्या राजकारणामुळे प्रमुख पक्षाच्या मतदानावर फारसा फरक पडत नाही. तसेच मुस्लीम मतदानही स्थानिक निवडणुकीशिवाय इतर निवडणुकांवर फारसा प्रभाव पाडू शकत नाही.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातर्फे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस पक्षातून राजीनामा देऊन आमदारकी सोडणारे अपक्ष उमेदवार म्हणून नाना पटोले, भाजपतर्फे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल जिंकून आले होते. तर नाना पटोले दुसऱ्या आणि शिशुपाल पटले हे तिसऱ्या क्रमांकावर होते

2009 च्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप संयुक्तपणे पटोले आणि पटले यांनी करून फेर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र 2014 च्या निवडणुकीत नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व पत्करून ही निवडणूक प्रफुल्ल पटेल यांच्या विरुद्ध लढून अडीच लाखाच्या फरकाने जिंकली होती.

चार वर्षानंतर केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढत नाना पटोले यांनी डिसेंबर 2017 मध्ये आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांचा 2000 मतांनी पराभव केला.

प्रमुख विरोधक

भंडारा-गोंदिया काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. तर भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे. पण यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर संभ्रम कायम आहे. राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल ठरवतील तोच उमेदवार असेल, तर भाजप आणि बसपा यांच्यात उत्सुक उमेदवार भरपूर असले तरी उमेदवारांची निवड जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्या सल्ल्यानुसार केली जाते.

प्रचाराचे प्रमुख मुद्दे

शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमालाला भाव, सिंचन ,पाणी पुरवठा आणि बेरोजगारी हे मुख्य मुद्दे असून प्रकल्पग्रस्त आणि मोठे उद्योग सुरू करण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची न केलेली पूर्तता हे महत्वाचे विषय आहेत. शहराअंतर्गत विकासाची कामे सुरू न करणे, भ्रष्टाचार, गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठिंबा हेही मुद्दे निवडणुकांमध्ये प्रभावी ठरू शकतात.

विद्यमान खासदारांची सकारात्मक-नकारात्मक बाजू

खासदार मधुकर कुकडे हे या आधी तीन वेळा भाजपचे आमदार होते. मागील वेळी पुन्हा विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण भाजपचे चरण वाघमारे यांनी मधुभाऊंना पराजित केले. मधुभाऊ हे मितभाषी असून मृदू स्वभावाचे आहेत. गावातील कोणाच्याही घरी सुख दुःखाच्या प्रसंगी ते उपस्थित असतात. ही त्यांची सकारात्मक बाब असली तरी आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात विशेष विकासाची कामे केली नाहीत.

इच्छुक प्रमुख उमेदवार

भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादीसाठी प्रफुल्ल पटेल यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात असून त्यांच्याऐवजी ऐनवेळी वर्षाताई पटेल यांचेही नाव उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. शिवाय नाना पटोले यांनी भाजप सोडल्यामुळे कोणतेही मोठे नाव भाजपकडे नसल्याने पटेल यांच्या तोडीचा उमेदवार भाजपाला शोधावा लागत आहे. यासाठी भाजपच्या गोटात अनेक नावे असून त्यात चरण वाघमारे, बावनकुळे, शिशुपाल पटले, परिणय फुके यांचाही विचार होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.