..तरच उदयनराजेंविरोधात शिवसेना लढेल, अन्यथा नाही : दिवाकर रावते

सातारा : साताऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मतदारसंघावर एकहाती पकड आहे. मात्र, तरीही अनेक पक्ष त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करतातच. अनेकदा प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट जप्तही झालं आहे. मात्र, यावेळी अनेक पक्षांनी एक-एक खासदार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याने उदयनराजेंविरोधातही साताऱ्यातून कुणी बलाढ्य उमेदवार उभा करेल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, शिवसेनेचे नेते आणि …

..तरच उदयनराजेंविरोधात शिवसेना लढेल, अन्यथा नाही : दिवाकर रावते

सातारा : साताऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मतदारसंघावर एकहाती पकड आहे. मात्र, तरीही अनेक पक्ष त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करतातच. अनेकदा प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट जप्तही झालं आहे. मात्र, यावेळी अनेक पक्षांनी एक-एक खासदार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याने उदयनराजेंविरोधातही साताऱ्यातून कुणी बलाढ्य उमेदवार उभा करेल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक घोषणा केली आहे. खरंतर ही घोषणा आहे की ऑफर, हे तुम्हीच ठरवा.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री दिवाकर रावते काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे जर अपक्ष निवडणूक लढणार असतील, तर त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही. शिवाय, त्यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी प्रयत्न करु. मात्र, राष्ट्रवादीकडून ते लढले तर त्यांच्या विरोधात नक्की शिवसेना उमेदवार देईल.” – शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते

एकंदरीत शिवसेनेला उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून खासदार असण्याला काहीच हरकत नाही, मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार असतील, तर सेनेला हरकत असल्याचे दिसून येते आहे. कारण अपक्ष लढल्यास उमेदवार नाही आणि राष्ट्रवादीकडून लढल्यास विरोधात उमेदवार, अशी काहीशी ऑफरयुक्त इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ऑफरयुक्त इशाऱ्याची दखल उदयनराजे भोसले घेतील का, याबाबत शंका आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *