Bhandara-Gondia Lok sabha Result : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ

Bhandara-Gondia Lok sabha Result : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ
भंडारा-गोंदिया : सुनील मेंढे

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा  60.50 टक्के मतदानाची नोंद झाली. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने सुनील मेंढे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली. 2014 साली या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर नाना पटोले लढून जिंकले होते. पुढे त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि यंदा नागपुरातून नितीन गडकरींविरोधात लढत दिली. नाना पटोलेंनी भाजप सोडल्याने इथे पोटनिवडणूक झाली. त्यावेळी तिथे राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांचा विजय झाला. मात्र यंदा राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे भंडारा-गोंदियात यंदा कोण बाजी मारणार याची उत्सुकता मतदानापासून होती. अखेर भाजपच्या सुनील मेंढे यांनी बाजी मारली.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ निकाल

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासुनील मेंढे (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीनाना पंचबुद्धे (राष्ट्रवादीपराभूत
अपक्ष/इतरएन. के. नान्हे (VBA)पराभूत

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असला, तरी 2014 साली नाना पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश करुन, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर नाराज होत, नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, नाना पटोले या मतदारसंघातून लढण्याऐवजी नागपुरातून गडकरींविरोधात लढले. त्यामुळे आघाडीकडून इथून नाना पंचबुद्धे रिंगणात उतरले. तर सुनील मेढें हे भाजपकडून लढले.
भंडारा जिल्ह्याचा विचार केला असता या ठिकाणी एकूण 9 लाख 83 हजार 693 इतके मतदार आहेत. तर गोंदिया जिल्ह्यात 8 लाख 25 हजार 255 मतदार आहेत. एकूण हे दोन्ही जिल्हे मिळून 18 लाख 8 हजार 948 इतके मतदार मतदान करणार आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI