Maval Lok sabha result 2019 : मावळ लोकसभा मतदारसंघ निकाल

मावळ लोकसभा मतदारसंघ :  मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.49 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का एक टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक होती. या मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काँग्रेस- …

Maval Lok sabha result 2019 : मावळ लोकसभा मतदारसंघ निकाल

मावळ लोकसभा मतदारसंघ :  मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 59.49 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का एक टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक होती. या मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार तर वंचित बहुजन आघाडीकडून राजाराम पाटील यांच्यात तिहेरी लढत होती.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाश्रीरंग बारणे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीपार्थ पवार (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरराजाराम पाटील (VBA)पराभूत

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक

महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या रंगतदार लढत म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जाते. यामध्ये नवखा असलेला पार्थ पवार यांची थेट लढत सलग तीन वेळा मावळ लोकसभा मतदारसंघात भगवा फडकवत असलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याविरुद्ध होत आहे. पार्थ पवार पर्यायाने अजित पवार यांच्याशी श्रीरंग बारणे यांची लढत होती. राष्ट्रवादीकडून विकासाच्या मुद्यावर या निवडणुकीला सामोरे गेले तर शिवसेना ही गेल्या तीन वेळी केलेल्या कामाच्या जोरावर.

विधानसभा निहाय 2014 आणि 2019 ची मतदानाची आकडे 

एकूण मतदार संख्या 22,97,405

2014 लोकसभा विधानसभा निहाय आकडेवारी

 • पनवेल-2,17,089
 • कर्जत-1,61,915
 • उरण-1,78,051
 • मावळ-1,87,488
 • चिंचवड-2,49,945
 • पिंपरी-1,79,461

(झालेल एकूण मतदान 1,174,332)

2019 लोकसभा विधानसभा निहाय आकडेवारी

 • पनवेल -2,98,349
 • कर्जत -1,89,,588
 • उरण – 1,95,101
 • मावळ – 2,11,383
 • चिंचवड – 2,83,004
 • पिंपरी -1,89,404

(झालेले एकूण मतदान – 13,66,818)

2019 मावळ लोकसभा मतदारसंघा मधील मतदान %

 • पनवेल – 55.33%
 • कर्जत – 67.76%
 • उरण -67.21%
 • मावळ – 62.60%
 • चिंचवड – 56.19%
 • पिंपरी -54.46%

2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात चिंचवड विधानसभेमधील अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवली होती. यांच्या दोघामध्ये थेट लढत झाली होती. त्यावेळी लक्ष्मण जगताप यांना शेकाप-मनसे यांनी पाठिंबा दिला होता.

2019 मधील मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण 22 लाख 97 हजार 405 मतदारांपैकी 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात एक टक्यांनी घट झाली. पिंपरी आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं.

कोणाकोणाच्या सभा
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवारासाठी मोठ्या प्रमाणत सभा झाल्या. राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार,अजित पावर,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,सातारा खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील तर शिवसेना महायुतीकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, राज्यमंत्री विजय शिवतारे, तर घाटाखाली म्हणजेच पनवेल, उरण,कर्जत या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या.

मावळ लोकसभा मतदारसंघात गाजलेले मुद्दे

भूमीपुत्र विरुद्ध राजपुत्र म्हणजे श्रीरंग बारणे हे भूमीपुत्र तर पार्थ पवार हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव म्हणून ते राजपुत्र असा संघर्ष तयार झाला होता. तसेच पार्थ पवार यांचे ट्रोल झालेले भाषण, पिंपरी चिंचवडमधील वादग्रस्त ख्रिश्चन धर्मगुरूची भेट, या मुद्द्यावरुन हिंदुत्ववादी संघटना आणि विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणत पार्थ पवार यांना ट्रोल केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांच्या वैयक्तीक आयुष्यातील व्हिडीओ मोठ्यां प्रमाणात व्हायरल झाले. तर शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दत्तक घेतलेल्या गावाचा विकासाचा मुद्दा असे अनेक मुद्दे प्रचारात गाजले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *