Raver Lok sabha Result 2019 : रावेर लोकसभा मतदारसंघ निकाल

रावेर लोकसभा मतदारसंघ : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या उल्हास पाटील यांचा पराभव केला. रावेर लोकसभा मतदारसंघात 23 मे रोजी मतदान झाले. या मतदारसंघात भाजपकडून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे विरुद्ध काँग्रेसकडून उल्हास पाटील अशी लढत झाली. रावेर लोकसभा मतदारसंघात 61.40 टक्के मतदानाची नोंद झाली. मागील लोकसभा …

Raver Lok sabha Result 2019 : रावेर लोकसभा मतदारसंघ निकाल

रावेर लोकसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या उल्हास पाटील यांचा पराभव केला. रावेर लोकसभा मतदारसंघात 23 मे रोजी मतदान झाले. या मतदारसंघात भाजपकडून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे विरुद्ध काँग्रेसकडून उल्हास पाटील अशी लढत झाली. रावेर लोकसभा मतदारसंघात 61.40 टक्के मतदानाची नोंद झाली. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी घसरला. सन 2014 मध्ये रावेर मतदारसंघात 63.48 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या घसरलेल्या मतदानटक्क्याचा कोणाला फायदा होतो आणि कोणाला नुकसान होणार याची उत्सुकता मतदानापासून लागून होती.

रावेर लोकसभा मतदारसंघ

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनारक्षा खडसे (भाजप) विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीउल्हास पाटील (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरनितीन कांडेलकर (VBA)पराभूत

रावेर लोकसभा मतदारसंघात मतदार पुरुष ९,२३,६२७, स्त्री ८,४९,४५१, इतर २९ असे एकूण १७,७३,१०७ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष ५,८३,४२७, स्त्री ५,०५,२६२ आणि इतर १ अशा एकूण १०,८८,६९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये मतदानाची टक्केवारी पुरुष ६३.१७ टक्के, स्त्री ५९.४८ टक्के, इतर ३.४५ टक्के अशी एकूण ६१.४० टक्के मतदान झाले. रावेर मतदारसंघात सर्वाधिक मलकापूर येथे ६७.१ तर कमी मतदान तर भुसावळ ५२.३९ टक्के इतके झाले आहे.

रावेरची लढत एकतर्फी वाटत असली तरी त्याठिकाणी एकनाथ खडसेंच्या स्नुषा आणि विद्यमान खासदार रक्षा खडसेच निवडून येतील, असा अंदाज पूर्वीपासूनच वर्तवण्यात आला. लोकसभेच्या प्रमुख लढतीत रावेरच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष होते. एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंच्या विरोधात ऐनवेळी काँग्रेसकडे मतदारसंघ गेल्यानंतर माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी आव्हान उभे केले.

मतदानानंतर मात्र रक्षा खडसेंच्या विजयाचा दावा प्रबळ मानला गेला. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याने ते निवडणुकीच्या प्रचारापासून दूर होते. परंतु रावेर मतदारसंघात त्यांनी काही सभा घेतल्या. रक्षा खडसे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *