कुणावर खूनाचा, तर कुणावर बलात्काराचा आरोप, सर्वात श्रीमंत उमेदवार कोणता?; पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची कुंडली उघड

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी 21 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाबरोबरच पोलीसही अलर्ट झाले आहेत. संवेदनशील भागात मोठा बंदोबस्त करण्यात येणार आहे. सर्वांनी शांततेत मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन केलं जात आहे.

कुणावर खूनाचा, तर कुणावर बलात्काराचा आरोप, सर्वात श्रीमंत उमेदवार कोणता?; पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची कुंडली उघड
lok sabha election 2024Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 11:33 AM

लोकसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. येत्या 19 तारखेला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मिळून 102 जागांचा समावेश आहे. या सर्व जागांवर 19 एप्रिल रोजी मतदान केलं जाणार आहे. या निवडणुकीसाठी 1625 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांची कुंडली उघड झाली आहे. यातील 252 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर 450 उमेदवार करोडपती आहेत. विशेष म्हणजे या सर्वांमध्ये काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

एडीआरने 1625 उमेदवारांपैकी 1618 उमेदवारांच्या शपथपत्रांचं विश्लेषण केलं आहे. त्यानंतर त्यांनी एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार 102 जागांवरील 42 जागा अशा आहेत की जिथे तीनहून अधिक उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. या रिपोर्टनुसार 1618 उमेदवारांपैकी 16 टक्के म्हणजे 252 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर 10 टक्के म्हणजे 161 उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

भडकावू भाषण, हत्या, रेप

यापैकी सात उमेदवारांवर हत्येचे गुन्हे दाखल आहेत. तर 19 उमेदवारांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 18 उमेदवारांवर महिलांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. एकावर तर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तर 35 उमेदवारांवर भडकावू भाषण दिल्याचाही आरोप आहे.

गुन्हेगारीत कोण पुढे?

पहिल्या टप्प्यात बिहारच्या चार जागांवर मतदान होणार आहे. यातील आरजेडीच्या सर्व चारही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर डीएमकेच्या 22 पैकी 13, सपाच्या 7 पैकी 3, टीएमसीच्या 5 पैकी 2, भाजपच्या 77 पैकी 28, एआयएडीएमकेच्या 36 पैकी 13, काँग्रेसच्या 56 पैकी 19 आणि बसपाच्या 86 पैकी 11 उमदेवारांवर गुन्हे दाखल आहेत. आरजेडीच्या चारपैकी दोन, डीएमकेच्या 22 पैकी 6, सपाच्या सातपैकी दोन, टीएमसीच्या पाच पैकी एका उमेदवारावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर बीजेपीच्या 14, एआयएडीएमकेच्या 6, काँग्रेसच्या 8 आणि बसपाच्या 8 उमेदवारांवरही अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

महाराष्ट्रात पाच जागांवर मतदान

महाराष्ट्रात येत्या 19 तारखेला पाच जागांवर मतदान होणार आहे. त्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरच्या जागेचा समावेश आहे. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत भाजप नेते नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांचं भवितव्य मतेपेटीत बंद होणार आहे. त्यानंतर राज्यात दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी पार पडणार असून यावेळी 8 जागांसाठी मतदान होणार आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.