AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनलॉकनंतर 71 दिवसांत साई चरणी 32 कोटीचं दान, तर तुळजाभवानी मंदिरात दर्शन पासची संख्या वाढवली 

71 दिवसांत साई चरणी तब्बल 32 कोटी 3 लाख 43 हजार 900 रुपयांचं दान प्राप्त झालं आहे. तर तुळजाभवानी मंदिरात दर्शन पासची संख्या वाढवण्यात आली आहे.

अनलॉकनंतर 71 दिवसांत साई चरणी 32 कोटीचं दान, तर तुळजाभवानी मंदिरात दर्शन पासची संख्या वाढवली 
| Updated on: Jan 29, 2021 | 12:03 AM
Share

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिर्डीतील साई मंदिर 16 नोव्हेंबरला खुलं करण्यात आलं. त्यानंतर 71 दिवसांत सुमारे 12 लाख 2 हजार 192 भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. या 71 दिवसांत साई चरणी तब्बल 32 कोटी 3 लाख 43 हजार 900 रुपयांचं दान प्राप्त झालं आहे. तशी माहिती साई मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे. नववर्षांचं स्वागत साई दर्शनाने करण्याच्या भावनेतून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले होते. त्याच बरोबर ख्रिसमच्या सुट्ट्यांमुळेही साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. या भाविकांना दर्शन घेताना साई चरणी भरभरुन दान केल्याचं पाहायला मिळत आहे. (32 crore donation in 71 days at Sai Baba temple)

साई चरणी जमा झालेल्या दान रुपातील पैशाचं विवरण

रोख देणगी – 6 कोटी 18 लाख 70 हजार 361 रुपये

मनीऑर्डर – 50 लाख 71 हजार 979 रुपये

ॲानलाईन देणगी – 6 कोटी 39 लाख 1 हजार 896 रुपये

डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे – 2 कोटी 62 लाख 28 हजार 326 रुपये

चेक, डीडीद्वारे – 3 कोटी 5 लाख 89 हजार 626 रुपये

परकीय चलन – 22 लाख 60 हजार 165 रुपये

दक्षिणा पेटीत – 13 कोटी 4 लाख 20 हजार 547 रुपये

एकूण देणगी – 32 कोटी 3 लाख 42 हजार 900 रुपये

रोख आणि ऑनलाईन स्वरुपातील देगण्यांसह साई चरणी 796 ग्रॅम सोने आणि 12 किलो ग्रॅम चांदीचं दानही भाविकांनी केलं आहे.

तुळजाभवानीच्या दर्शन पासची संख्या वाढवली

तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी दिलासादायक बातमी आहे. देवीच्या मोफत दर्शन पासची संख्या वाढवण्यात आली आहे. कोरोना संकट असल्याने मंदिर संस्थानकडून दररोज 12 हजार इतक्या मर्यादीत स्वरूपात पास दिले जात होते. मात्र, भाविकांची गर्दी पाहता आता मोफत पासची संख्या वाढविण्यात आली आहे.(increase in number of Darshan passes at Tulja Bhavani temple)

देवीच्या दर्शनासाठी मंगळवार , शुक्रवार व रविवार असे तीन दिवस मोठी गर्दी असते. त्यामुळे या दिवशी आणि महत्वाच्या सण, उत्सवा दिवशी 30 हजार मोफत पास दिले जाणार आहेत. तर हे 3 दिवस वगळता इतर दिवशी 20 हजार भाविकांना दर्शन पास दिले जाणार आहेत. सध्या फक्त 12 हजार भक्तांना मोफत दर्शन पास दिला जात होता. मात्र आता पासची संख्या वाढवल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे.

पेड दर्शन पासची किंमतही कमी

दर्शन पासची संख्या वाढवण्यासोबतच पेड दर्शन पासची किंमत 300 वरून 200 रुपये करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंदीर विश्वस्त समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली. तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव यशस्वीरित्या पार पडला आहे. मंदिर सुरू झाल्याने परिसरातील अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोरोना संकट अद्याप कायम असल्याने तुळजाभवानी मंदिर परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. मंदिर विश्वस्त बैठकीस आमदार राणाजगजीतसिंह पाटील , नगराध्यक्ष सचिन रोचकरी , मंदिरचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे उपस्थित होते.

संबंधित बातम्या : 

शिर्डीत साई दर्शनासाठी अलोट गर्दी, 2 किलोमीटरपर्यंत दर्शन रांगा

Photos : “आई राजा उदो उदो”च्या गजरात तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

news of shirdi saibaba temple and tuljabhavani

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.