AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना 41 कोटींची मदत; दिवाळीच्या आत खात्यावर जमा करण्याच्या सूचना

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 41.43 लक्ष मदत प्राप्त झाली असून, अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या आत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून लाखांच्या पोशिंद्याची दिवाळी गोड करावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना 41 कोटींची मदत; दिवाळीच्या आत खात्यावर जमा करण्याच्या सूचना
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 2:09 PM
Share

नाशिक: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 41.43 लक्ष मदत प्राप्त झाली असून, अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या आत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून लाखांच्या पोशिंद्याची दिवाळी गोड करावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

भुजबळ यांनी आज येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, अदरसुल उपबजार येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार नरेंद्र दराडे, प्रांताधिकारी सोपान कासार, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, बाजार समितीचे प्रशासकीय सभापती वसंत पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, अरुण थोरात अंदरसुल बाजार समितीचे मकरंद सोनवणे, संचालक किसनराव धनगे, विश्वासराव धनगे, प्रमोद पाटील, साहेबराव आहेर, मधुकर साळवे, समीर देशमुख, ज्ञानेश्वर दराडे, शरद शिंदे, प्रेमलता अट्टल, सुवर्णा सोनवणे, राजेंद्र शेलार, बाळासाहेब आवारे, जयाजी शिंदे, गणपत भवर, चंद्रकांत शिंदे, वाल्मिक गोरे, भानुदास जाधव, ज्ञानेश्वर शेवाळे, रतन बोरणारे, सचिन कळमकर, नवनाथ काळे, बाळासाहेब गुंड, नगरसेवक दीपक लोणारी, सहायक निबंधक पाटील, गटविकास अधिकारी उमेश देशमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे गेले दोन वर्षे कामांना अडचणी होत्या. त्या आता दूर झाल्यापासून कामांना पुन्हा एकदा गतीने सुरुवात झाली आहे. परंतु कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. नागरिकांनीही योग्य खबरदारी घेवून सहकार्य करावे. कोरोनाच्या काळात अन्न, धान्याची कमतरता आपण पडू दिली नाही यासाठी माथाडी कामगारांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, बाजार समितीत जमा होणारा महसूल हा विकासासाठी व शेतकरी हितासाठी खर्च करण्यात यावा. उत्तम पद्धतीने महसूल गोळा करावा आणि उदार मनाने शेतकऱ्यांसाठी खर्च करावा. सर्वांना अतिशय जागरूक राहून काम करण्याची आवश्यकता आहे. जीएसटीची मोठी रक्कम केंद्र सरकारकडे जमा होत असून राज्याच्या हिश्शाची येणे असलेली रक्कम राज्य शासनास केंद्र सरकारकडून मिळेल तेव्हा मिळेल, परंतु त्यातूनही मार्ग काढत विकास कामे केली जात आहेत, भविष्यातही शासन करत राहील असे सांगून शेतकरी कष्टकरी व नागरिकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

इतर बातम्याः

उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जळगावमध्ये 12 अंश सेल्सियस नीचांकी तापमानाची नोंद

शेतकऱ्यांना दिलासा; नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 10 नव्हे फक्त 3 दिवस बंद

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.