महाराष्ट्रातील 500 कंपन्यांचा गळा कोण घोटतंय? वाचा सविस्तर रिपोर्ट
कोरोनाच्या तडाख्यामुळे अनेक कंपन्यांनी आपला कारभार बंद करण्यासाठी अर्ज केल्याची बातमी वाचायला मिळाली. यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढेल. | 500 companies in Maharashtra

मुंबई: कोरोना संकटामुळे (Coronavirus) राज्यातील तब्बल 500 कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. त्यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले. (Rohit Pawar on 500 companies in Maharashtra planning for wind up)
आधी नोटबंदी, त्यानंतर जीएसटीची घाईघाईने अंमलबजावणी केल्याने कंपन्यांची आर्थिक घडी विस्कटली होती. मात्र, आता कोरोनाच्या तडाख्यामुळे अनेक कंपन्यांनी आपला कारभार बंद करण्यासाठी अर्ज केल्याची बातमी वाचायला मिळाली. यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढेल. महाविकासआघाडी सरकार यामधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण या सगळ्यावर केंद्र व राज्याने मिळून मार्ग काढण्याची गरज असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आधी नोटबंदी,नंतर घाईघाईत आणलेला #GST व आता कोरोनामुळं अडचणीत आलेल्या काही कंपन्यांनी कंपनी बंद करण्यासाठी अर्ज केल्याची बातमी वाचायला मिळाली. यामुळं बेरोजगारी प्रचंड वाढेल. यातून मार्ग काढण्यासाठी #मविआ सरकार प्रयत्नशील आहे,पण यावर केंद्र व राज्याने मिळून मार्ग काढण्याची गरज आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 18, 2020
काय आहे नक्की प्रकरण?
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक उद्योगांना फटका बसला आहे. जवळपास 500 उद्योजकांनी कंपन्या बंद करण्यासाठी नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीतील घाईमुळे कंपन्यांची आर्थिक घडी अगोदरच विस्कटली होती.
मात्र, कोरोनामुळे या कंपन्यांचा उरलासुरला डोलाराही कोसळला. अशातच देशात आर्थिक मंदीचे ढग दाटल्याने उद्योजकांनी कंपनी बंद करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. कंपनी नोंदणी कार्यालयाकडे आलेल्या अर्जांपैकी १७५ कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याबाबतचे निवेदन प्रसिद्ध झाले आहे.
संबंधित बातम्या:
बापाच्या नोकरीवर मुलाचा अधिकार तर मग विवाहित मुलीचा का नको ? काय म्हणालं कोर्ट
धूत कुटुंबाकडून ‘व्हिडीओकॉन’ निसटले, नवे मालक कोण?
(Rohit Pawar on 500 companies in Maharashtra planning for wind up)
