बापाच्या नोकरीवर मुलाचा अधिकार तर मग विवाहित मुलीचा का नको ? काय म्हणालं कोर्ट !

बापाच्या नोकरीवर मुलाचा अधिकार तर मग विवाहित मुलीचा का नको ? काय म्हणालं कोर्ट !

वडिलाच्या नोकरीवर मुलाचा अधिकार असतो; मग विवाहित मुलीचा का नको?, असा सवाल करत कर्नाटकातील एका महिलेने थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

prajwal dhage

|

Dec 17, 2020 | 5:34 PM

बंगळुरु : तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर प्रगतीपथावर असताना देशात सामाजिक बदलाचेही वारे वाहू लागले आहेत. देशातील महिला आपल्या अधिकारांची लढाई खंबीरपणे लढताना दिसत आहेत. स्त्री-पुरुष समानतेचा असाच एक खटला सध्या चर्चेत आला आहे. वडिलाच्या नोकरीवर मुलाचा अधिकार असतो; मग विवाहित मुलीचा का नको?, असा सवाल करत कर्नाटकातील एका महिलेने थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीला नोकरीवर रुजू न केल्यामुळे या मुलीने हा पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे न्यायालयानेही वडिलांच्या नोकरीवर मुलीचाही समान अधिकार असल्याचा निकाल दिला आहे. (married doughter can claim on job of father ordered karnataka court)

नेमका प्रकार काय?

याचिकाकर्त्या महिलेचे वडील अशोक अदिवेप्पा मादिवालर हे कर्नाटकातील बेळगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिव या पदावर नोकरी करत होते. नोकरीवर असताना त्यांचा 2016 साली अकस्मात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा एका खासगी कंपनीत नोकरीवर असल्यामुळे त्याने या नोकरीत स्वारस्य दाखवले नाही. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर मादिवालर यांच्या नोकरीवर त्यांच्या मुलीने अधिकार दाखवला. नोकरीवर रुजू करुन घेण्याची मागणी तीने केली. त्यासाठी तिने अर्जही केला. मात्र, बाजार समितीच्या सहसंचालकांनी मुलीचा अर्ज फेटाळून लावत तिला नोकरीवर देण्यास नकार दिला.

महिलेने ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

दरम्यान, अशोक मादिवालर यांची मुलगी भूननेश्वरी यांनी बाजार समितीच्या निर्णयावर आक्षेप नोंदवत थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. बाजार समितीचा हा निर्णय स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव करणारा असल्याचे ती म्हणाली. न्यायालयानेही विवाहित मुलीला कुटुंबाचा भाग न माणण्याच्या प्रक्रियेला असंवैधानिक सांगत कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा निर्णय भेदभाव निर्माण करणारा असल्याचे सांगितले. तसेच, फक्त अविवाहित मुलीला वडिलाच्या कुटुंबाचा हिस्सा समजणाऱ्या नियमालाही रद्दबातल ठरवलं.

न्यायाधीश काय म्हणाले?

न्यायाधीश एम. नागाप्रसन्ना यांच्या खंडपीठापुढे या याचिकेची सुनावणी झाली. यावेळी त्यांनी विवाहित मुलीलाही समान अधिकार तसेच समान संधी मिळायला हवी असं सांगितलं. तसेच, वडिलांच्या नोकरीवर विवाहित मुलाला अधिकार गाजवता येऊ शकतो, तर विवाहित मुलीला का नाही?, सावालही त्यांनी केला. त्याचबरोबर याचिकाकर्त्या मुलीला नोकरीवर रुजू करुन घेण्याचे आदेशही न्यायलयाने दिले.

संबंधित बातम्या :

घरगुती सिलेंडरवर किती लाखांचा विमा मिळतो; कधी मिळते रक्कम?

GOLD RATE| सोन्याच्या दरात तेजी का? जाणून घ्या आजची किंमत

Uttar Pradesh Assembly Elections | उत्तर प्रदेशसाठी ओवेसींचा मोठा प्लॅन, योगींना टक्कर?

(married doughter can claim on job of father ordered karnataka court)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें