मुंबईकरांच्या डोक्यावर 99 होर्डिंगचा ‘काळ’, धोकादायक होर्डिंग हटवण्याची नोटीस

सोमवार, 13 मे रोजी मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर भलमोठ्ठं होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे शहर हादरलं. मात्र मुंबईकरांच्या डोक्यावर अशी अनेक धोकादायक होर्डिंग्स अजूनही आहेत. या दुर्घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. रेल्वे हद्दीमधील धोकादायक होर्डिंग हटवा,अशी नोटीस डिझास्टर अ‍ॅक्टखाली पालिकेने बजावली.

मुंबईकरांच्या डोक्यावर 99 होर्डिंगचा ‘काळ’, धोकादायक होर्डिंग हटवण्याची नोटीस
Mumbai Ghatkopar hoarding collapse
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 9:30 AM

सोमवार, 13 मे रोजी मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर भलमोठ्ठं होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे शहर हादरलं. अनेक लोक या होर्डिंगखाली दबले गेले, जखमी झाले. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 14 जणांना जीव गमवावा लागला आहे. मात्र मुंबईकरांच्या डोक्यावर अशी अनेक धोकादायक होर्डिंग्स अजूनही आहेत. ९९ होर्डिंगचा ‘काळ’ अजूनही घोंघावत आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. रेल्वे हद्दीमधील धोकादायक होर्डिंग हटवा,अशी नोटीस डिझास्टर अ‍ॅक्टखाली पालिकेने बजावली आहे.

दरम्यान घाटकोपर दुर्घटना स्थळी 40 तास रेस्क्यू ॲापरेशन सुरू आहे. अग्निशमन दलाचे 65 जवान हे 20 मशीनद्वारे मलबा हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर मलब्याखाली दबलेल्या वाहनांना काढण्यात आलं असून आणखी काही वाहन दबल्याचा अंदाज आहे ते काढण्याच काम सुरु आहे. आतापर्यंत 89 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. छेडानगर येथे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या भयंकर दुर्घटनेत 14 लोकांनी जीव गमावला आणि 74 जण गंभीर जखमी झाले असताना आता ही उपरती झाली आहे. संपूर्ण मुंबईमध्ये रेल्वे हद्दीत तब्बल 99 धोकादायक होर्डिंग असल्याचे पालिकेच्या तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे ही धोकादायक होर्डिंग तातडीने हटवा अशी नोटीस पालिकेने रेल्वे आणि संबंधितांना डिझास्टर अ‍ॅक्टखाली बजावली आहे.हे होर्डिंग हटवले नाहीत तर डिझास्टर अ‍ॅक्टनुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली

अनधिकृत फलकांवर तात्काळ कारवाईचे आदेश

दरम्यान मुंबईतील अनधिकृत फलकांवर तात्काळ कारवाईचे करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. सर्वाधिक महाकाय फलक हे ग्रॅन्टरोड, वांद्रे, अंधेरी, शिवडी येथे आहेत. शहरातील रेल्वेच्या हद्दीत असलेल्या १७९ जाहिरात फलकांपैकी 99 फलक हे 40 बाय 40 फुटांपेक्षा मोठे असून ते तत्काळ हटविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने रेल्वे प्राधिकरणाला दिले आहेत. हे फलक न हटवल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत पालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान मुंबईत एकूण 1 025 महाकाय जाहिरात फलक असून त्यापैकी सर्वाधिक फलक अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागात आहेत. तर तब्बल 179 फलक रेल्वेच्या हद्दीत असून या फलकांसाठी महानगरपालिकेकडून परवानगी घेतलेली नाही, असे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. मुंबईत रेल्वे, बेस्ट, बीपीटी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी या प्राधिकरणांच्या हद्दीत असे जाहिरात फलक उभे आहेत. मात्र त्यापैकी रेल्वे वगळता सर्व प्राधिकरणांच्या हद्दीतील फलकांसाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली आहे. परंतु, रेल्वेच्या हद्दीतील तब्बल 179 जाहिरात फलकांसाठी पालिकेची परवानगी घेतलेली नाही, असे पालिका प्रशासनानेच जाहीर केले आहे. मुंबईतील एकूण जाहिरात फलकांपैकी सर्वाधिक फलक अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भागात असून त्यांची संख्या 134 इतकी आहे. त्या खालोखाल ताडदेव, ग्रॅन्टरोड परिसरात 131, वांद्रे, खार पश्चिममध्ये 129 अंधेरी, जोगेश्वरी पूर्वमध्ये 122 जाहिरात फलक आहेत

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.