Navi Mumbai Murder : दारू पिऊन त्रास देत असल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या, उत्तर प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता रामायण ललसा हा दारु पिऊन त्रास द्यायचा म्हणून त्याच्या डोक्यात पेवरब्लॉक घालून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Navi Mumbai Murder : दारू पिऊन त्रास देत असल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या, उत्तर प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
दारू पिऊन त्रास देत असल्याने मित्रानेच केली मित्राची हत्या
Image Credit source: TV9
रवी खरात

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 19, 2022 | 6:18 PM

नवी मुंबई : दारु पिऊन त्रास द्यायचा म्हणून मित्रानेच मित्राची हत्या (Murder) केल्याची घटना नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये घडली आहे. रामायण ललसा उर्फ गुरुदेव उर्फ बाबा असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपी मित्राला अटक (Arrest) केली आहे. अरुण कुमार भरती असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

हत्या करुन उत्तर प्रदेशात पळून गेला आरोपी

एपीएमसी मार्केटमध्ये 14 ऑगस्ट रोजी एका इसमाचा मृतदेह आढळला होता. एपीएमसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी घटनेची नोंद करत प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान हा मृतदेह रामायण ललसा उर्फ गुरुदेव उर्फ बाबा या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला असता मयताच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याची निष्पन्न झाले. रामायण ललसाची हत्या केल्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेला होता.

आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता रामायण ललसा हा दारु पिऊन त्रास द्यायचा म्हणून त्याच्या डोक्यात पेवरब्लॉक घालून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, आरोपीकडून याआधीही कोणता गुन्हा घडला आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

नांदेडमध्येही दारुसाठी मारहाण करणाऱ्या तरुणाची आईकडून सुपारी देऊन हत्या

दारुसाठी मुलगा त्रास द्यायचा, शिवीगाळ आणि मारहाण करायचा म्हणून कंटाळलेल्या आईने सुपारी देऊन हत्या केल्याची घटना नांदेडमध्ये काल उघडकीस आली आहे. घरात भाड्याने राहणाऱ्या दोन भाडेकरुंना आईने 60 रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी 10 हजार रुपये अॅडव्हान्स दिले होते. आरोपींनी तरुणाच्या डोक्यात वार करुन त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह बारड महामार्गाजवळ फेकला. अज्ञात मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी याचा तपास केला असता ही घटना उघड झाली. (A friend was killed by a friend who was harassing him by drinking alcohol in Navi Mumbai)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें