AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोक्यातच गेला! वारंवार डोअर बेल वाजवणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर गोळीबार… मुंबई हादरली, नेमकं काय घडलं?

परळ येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. एका डिलिव्हरी बॉयने वारंवार बेल वाजवल्याने संतापलेल्या व्यक्तीने एअर रायफलमधून गोळी झाडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

डोक्यातच गेला! वारंवार डोअर बेल वाजवणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर गोळीबार... मुंबई हादरली, नेमकं काय घडलं?
Gun shotImage Credit source: Freepik
| Updated on: Aug 17, 2025 | 12:37 PM
Share

आजकाल घरातील राशनभरण्यापासून ते खाद्य पदार्थ ऑर्डर करण्यापर्यंत अनेकजण ऑनलाईन अॅपचा वापर करतात. काही मिनिटांच्या आत डिलिव्हरी बॉय ते आपल्याला घरपोच देतात. पण मुंबईच्या परळ भागात शुक्रवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका डिलिव्हरी बॉयवर ग्राहकाने थेट गोळी झाडली आहे. या घटनेने संपूर्ण परळ हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना मुबंईतील परळ येथीस नित्यानंद कॉलनीतील प्रकाश कॉटन इमारतीत घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने डिलिव्हरी बॉयने वारंवार डोरबेल वाजवल्याने संतापून हवेत गोळी झाडली. या संपूर्ण घटनेत डिलिव्हरी बॉय थोडक्यात बचावला असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकाश कॉटन इमारतीच्या आठव्या मजल्यावर राहणाऱ्या सौरभ कुमार याने शुक्रवारी संध्याकाळी एका ऑनलाइन मेडिकल अॅपद्वारे औषधे मागवली होती. डिलिव्हरी बॉय औषधे घेऊन त्यांच्या फ्लॅटच्या दारापर्यंत पोहोचला. त्याने बेल वाजवली, पण सौरभने दार उघडले नाही.

वाचा: भल्याभल्यांना नादाला लावणारी सर्वात श्रीमंत बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही! एका रात्रीत कमावत होती 90 लाख

एअर रायफलमधून हवेत गोळी झाडली

यानंतर डिलिव्हरी बॉयने दोन-तीन वेळा बेल वाजवली. यामुळे सौरभ भडकला. रागाच्या भरात त्याने दार उघडले आणि डिलिव्हरी बॉयला पाहताच आपल्या एअर रायफलमधून हवेत गोळी झाडली. नशीबाने गोळी हवेतच गेली आणि कोणालाही दुखापत झाली नाही. डिलिव्हरी बॉयने तात्काळ आपला जीव वाचवला आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सौरभला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली.

वारंवार बेल वाजवणे आवडले नाही

सौरभने पोलिसांना सांगितले की, डिलिव्हरी बॉयने वारंवार बेल वाजवल्याने त्याला राग आला, त्यामुळे त्याने रागाच्या भरात हे पाऊल उचलले. डिलिव्हरी करणारा व्यक्तीही खूप घाबरला. त्याने सांगितले की, त्याने फक्त आपले काम केले आणि तो कोणत्याही अडचणीत पडू इच्छित नव्हता. तरीही, गोळी झाडल्याने त्याला खूप भीती वाटली.

पोलिसांनी प्रकरण नोंदवले

एनएम जोशी मार्ग पोलिसांनी प्रकरण नोंदवले असून तपास सुरू आहे. शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, सौरभ सहसा लवकर रागावतो, पण अशी घटना त्यांच्या परिसरात पहिल्यांदाच घडली आहे. शेजाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.