तास-दीड तास ट्रॅक्टरच्या शिटाखाली ‘साप’ होता…त्याला कळलंच नाही… पण कळताच जे काही घडलं…

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

|

Updated on: Nov 19, 2022 | 2:54 PM

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकरी विलास यांच्या शेतात सकाळी सपाटीकरण सुरू होते, त्यातचट्रॅक्टर चालकाच्या शिटाखाली साप निघाला होता.

तास-दीड तास ट्रॅक्टरच्या शिटाखाली 'साप' होता...त्याला कळलंच नाही... पण कळताच जे काही घडलं...
Image Credit source: TV9 Network

नाशिक : साप म्हंटलं किंवा पाहिला तरी अनेकांची त्रेधातीरपीट उडून जात असते. अनेकांच्या दुचाकीत साप आढळून आल्याने अनेकांची पळता भुई थोडी होत असते. कसाबसा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत असतात. कारण, सर्प दंश झाला तर अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच नाशिकच्या देवळा तालुक्यातील एका तलाठयांना दुचाकी चालवतांना सर्पदंश झाल्याची घटना समोर आलेली असतांना चक्क तास दीड-तास आपल्याच शिटाखाली नागाला घेऊन ट्रॅक्टरची सफर घडवली आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण ही घटना नाशिकच्या जामखेडा येथील शेतकऱ्यासोबत घडली आहे. शेतकरी विलास बाळू मोरे ट्रॅक्टरने शेतातील सपाटी कारणासाठी जेसीबीच्या सहाय्याने माती वाहण्याचे कामा करीत होते. सकाळी आठला ट्रॅक्टरने माती वाहण्याचे सुरू केल्यानंतर दोन ते तीन ट्रीप टाकून झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकरी विलास यांच्या शेतात सकाळी सपाटीकरण सुरू होते, त्यातचट्रॅक्टर चालकाच्या शिटाखाली साप निघाला आहे.

सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शेतात सपाटीकरण सुरू होते, त्या दरम्यान ट्रॅक्टरने माती वाहण्याचे काम सुरू होते, दोन-तीन ट्रीप झाल्यावर विलास यांचे भाऊ आले.

हे सुद्धा वाचा

ट्रॅक्टरच्या पाठीमागील बाजूला मोरे यांचे भाऊ गेलेले असतांना त्यांना ट्रॅक्टरच्या शिटाखाली साप दिसला, त्यामध्ये त्यांनी जोरजोरात आरडाओरड सुरू केली.

त्यामध्ये चालक लागलीच खाली उतरला तर बघताच त्याची तारांबळ उडाली होती, गेले काही तास आपण हा साप घेऊन फिरत असल्याचे लक्षात आल्याने बाका प्रसंग टळला अशी भावनाच त्याने व्यक्त केली.

त्याचे फोटो काढून त्यांनी हा साप कोणता आहे अशी विविध ठिकाणी विचारणा केली त्यात तो विषारी नाग असल्याचे समोर आले आहे.

आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून सापाला बाहेर काढण्यात आले, पुढील बाजूस जाण्यास मार्ग नसल्याने तो बाहेर आला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनी सापाला एका डब्यात टाकून नंतर जंगलात सोडून दिले आहे, मात्र हा प्रसंग फोटोसहित शेयर होत असल्याने ग्रामीण भागात जोरदार चर्चा होत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI