AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Potholes: ‘आप’ ली “आय लव्ह खड्डा” मोहीम; खड्डे बुजवल्याचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कामाची पोलखोल

आदमी पार्टीने मुंबई भर 'आय लव्ह खड्डा' मोहीम राबवली. या मोहिमेच्या माध्यमातून मुंबई शहरातील खड्डय़ांच्या समस्यांबाबत मुंबई महानगरपालिकेचा दावा किती फोल आहे हे आम आदमी पार्टीने पुराव्यानिशी सिद्ध करुन दाखवले. आम आदमी पार्टीने फोर्ट येथे कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीने मुंबईतील खड्ड्यांची गंभीर समस्या मांडली.

Mumbai Potholes: 'आप' ली आय लव्ह खड्डा मोहीम; खड्डे बुजवल्याचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कामाची पोलखोल
| Updated on: Jul 13, 2022 | 5:13 PM
Share

मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबईतील(Mumbai) सर्व खड्डे बुजवल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून(BMC) करण्यात येतो. मात्र, आम आदमी पार्टीने(Aam Aadmi Party) मुंबईत अनोखी “आय लव्ह खड्डा”( I Love Khadda campaign) मोहीम राबवली. या मोहिमेच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी थेट गुगल मॅपच्या माध्यमातून मुंबईतील खडड्यांचे लोकेशन ट्रेस केले. त्या स्पॉटवर जाऊन तेथील लोकेशन डिटेक्ट करुन लोकशन सह त्या ठिकाणी “आय लव्ह खड्डा” असे पोस्टर हातात पकडून फोटो काढले आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने खड्डे बुजवल्याचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कामाची पोलखोल केली आहे. यानंतर जाहीर पत्रकार परिषद घेत आम आदमी पार्टीने मुंबईतील खड्ड्यांची स्थिती मांडली.

नेमेची येतो पावसाळा, नेमेची पडतात खड्डे अशी अवस्था आता संपुर्ण मुंबई शहराची झाली आहे. राज्य शासन आणि मुंबई महापालिका दरवर्षी कोट्यवधींचा निधी हा रस्त्यांच्या डागडुजीकरिता खर्च करतात. तरीही रस्त्यांवरील खड्डे ‘जैसे थे’ असून ही गंभीरबाब आहे. मुंबईकरांच्या कराचा पैसा खड्ड्यात जात असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते गोपल झवेरी यांनी केला.

आदमी पार्टीने मुंबई भर ‘आय लव्ह खड्डा’ मोहीम राबवली. या मोहिमेच्या माध्यमातून मुंबई शहरातील खड्डय़ांच्या समस्यांबाबत मुंबई महानगरपालिकेचा दावा किती फोल आहे हे आम आदमी पार्टीने पुराव्यानिशी सिद्ध करुन दाखवले. आम आदमी पार्टीने फोर्ट येथे कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीने मुंबईतील खड्ड्यांची गंभीर समस्या मांडली.

मुंबईत आय लव्ह खड्डा’ मोहीम राबवत असताना कफ परेड, कुलाबा, वाकोला, चेंबूर, खार, जोगेश्वरी पश्चिम, भांडुप, अंधेरी पश्चिम, चर्चगेट, बोरिवली, मालाड, गोरेगाव आणि मानखुर्द यांसारख्या वैविध्यपूर्ण भागात खड्डे दिसून आले. गेल्या 24 वर्षात मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील रस्त्यांवर 29,000 कोटी रुपये खर्च केले असून, मुंबईतील फक्त 800 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले असल्याचे गोपाल झवेरी यांनी सांगीतले.

कंत्राटदारांच्या देखरेखीच्या अभावामुळे खड्डे हे मुंबईतील रस्त्यांचे कायमस्वरूपी ठिकाण बनले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होऊन मृत्यूही ओढवत आहेत. 2014 ते 2019 या कालावधीत 150 लोकांचा मृत्यू झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबईतील खड्ड्यांमुळे अतिरेकी हल्ल्यापेक्षाही जास्त मृत्यू होतात, अशी टिका गोपाल झवेरी यांनी त्यावेळी केली.

खड्डे आणि मुंबई महानगपालिका हे मुंबईतील गुन्ह्यातील सर्वात प्रसिद्ध भागीदार बनले आहेत. त्यांच्या परिसरातील खड्ड्यांची पाहणी करताना, आपच्या स्वयंसेवकांनी आणि नेत्यांनी एका दिवसात संपूर्ण शहरात खड्डेच चिन्हांकित केले आहे. मुंबईच्या रस्त्यांची परिस्थिती भयान असून मुंबई चा सामान्य माणूस यातून जात आहे, अशी खंत आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास म्हणाले.

महानगरपालिकेला आपले काम करण्याऐवजी केवळ पोथॉल ट्रॅकिंग ॲप आणि हेल्पलाइन्स सारख्या प्रसिद्धी स्टंटमध्ये स्वारस्य आहे. शहराची किंमत केवळ मुंबईकरांच्या उद्ध्वस्त होण्यावर नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जीवनात निदर्शनास आणल्याप्रमाणे आहे. महानगरपालिकेने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांना मुंबईकरांच्या जीवनाची फारशी पर्वा नाही, आशी टिका आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष द्विजेंद्र तिवारी यांनी केली.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.