AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, शासन-प्रशासन दखल घेईना, सिल्लोडच्या महिलेचं मंत्रालयासमोर आंदोलन

अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, त्यामुळे आमचं जीव उध्वस्त झालंय, असा आरोप करत सिल्लोडच्या महिलेने मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोलन केलं. (Sillod woman protested in front of the mantralay)

अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, शासन-प्रशासन दखल घेईना, सिल्लोडच्या महिलेचं मंत्रालयासमोर आंदोलन
अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, त्यामुळे आमचं जीव उध्वस्त झालंय, असा आरोप करत सिल्लोडच्या महिलेने मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोलन केलं.
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 2:49 PM
Share

मुंबई : अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, त्यामुळे आमचं जीव उध्वस्त झालंय, असा आरोप करत सिल्लोडच्या महिलेने मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोलन केलं. आजपासून राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या गेटसमोरचं आंदोलन सगळ्याचं लक्ष वेधून घेत होतं. परंतु पुढील काही प्रकार घडायच्या आतमध्ये मरीन ड्राईव्ह पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं. (Abdul Sattar grabbed my land, government did not take Action, Sillod woman protested in front of the mantralay)

औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातील उंडणगावमधील आशाबाई बोराडे या महिलेने मंत्रालयाच्या गेट समोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या महिलेसोबत तिची मुलगी आणि सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड या देखील होत्या. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत तिघींनाही ताब्यात घेतलं.

अब्दुल सत्तार यांनी माझी जमीन हडपली

मंत्री अब्दुल सत्तार यांनी माझी जमीन बळकावल्याचा आरोप आशाबाई बोराडे या महिलेने तिने केला आहे. शिवाय या जमिनीवर त्यांनी बेकायदेशीररित्या व नियमबाह्य पद्धतीने कॉलेजची इमारत उभारलेली आहे, असं तिने म्हटलंय. अब्दुल सत्तार यांच्या त्रासामुळे आमचं संपूर्ण जीवन उध्वस्त होत असल्याचा आरोप तिने केला आहे सदर महिला ही शेतकरी कुटुंबातून असून तिचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दबावामुळे तहसीलदारांनी सुद्धा महिलेच्या नावावर महसूल अभिलेखामध्ये फेरफार घेण्यास टाळाटाळ केली असल्याचे तिचे म्हणणे आहे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही, असाही आरोप संबंधित महिलेने केला आहे. शासनाला निवेदन देऊन सुद्धा कुठलीही दखल न घेतल्याने आज मंत्रालयासमोर आंदोलन केलं, असं आशाबाई बोराडे यांनी सांगितलं.

(Abdul Sattar grabbed my land, government did not take Action, Sillod woman protested in front of the mantralay)

हे ही वाचा :

चंद्रपुरात पुन्हा ‘चिअर्स’, तब्बल 6 वर्षानंतर दारु विक्री सुरु, दुकानांसमोर मद्य शौकिनांची रेलचेल

बांधकाम सुरु असताना क्राँकीट लिफ्ट कोसळली, तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.