AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : मग ते कसले चाणक्य ? CJP च्या अभिजीत दीपकेंचा अमित शहांवर थेट निशाणा

कॉक्रोच जनता पार्टी (CJP) ला परदेशातून निधी मिळत असल्याच्या आरोपांवरून संस्थापक अभिजीत दीपके यांनी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. दीपके यांनी प्रश्न केला की, जर CJP ला बाहेरून फंडिंग मिळत असेल तर अमित शहा 'चाणक्य' कसे?

Abhijeet Dipke  :  मग ते कसले चाणक्य ?  CJP च्या अभिजीत दीपकेंचा अमित शहांवर थेट निशाणा
अभिजीत दीपकेंचे अमित शहांवर टीकास्त्र
| Updated on: Jul 30, 2026 | 12:13 PM
Share

तरूणाईचा आवजा बनून अख्खा देश गाजवणारी कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP ला बाहेरून, परदेशातून फंडिंग होत असल्याचा आरोप केला जात असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मात्र याच मुद्यावरून आता सीजेपचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी स्पष्टीकरण देत देशाच्या गृहमंत्र्यांनाच टोला लगावला आहे. कॉकरोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येतंय, पण अमित शहा असताना हे शक्य कसं झालं, असा प्रश्न माझ्या मनात येतो. कॉक्रोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर मग हे गृहमंत्री अमित शहा यांचं फेल्युअर आहे ना. तुम्ही चाणक्य कसले मग ? असा उपरोधिक सावल विचारत दीपके यांनी टीकास्त्र सोडलं. तुम्ही असताना बाहेरून फंडिग येत असेल तर तुम्ही स्वत: फेल झाला, तुम्ही (अमित शाह) राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीच दीपके यांनी केली. त्यांच्या या विधानाने चांगलीच खळबळ माजली आहे.

काय म्हणाले अभिजीत दीपके ?

जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाला,  विद्यार्थी जखमी झाले. गृहमंत्र्यांच्या ऑर्डरने हे झालं असा आरोप काल विरोधकांकडून करण्यात आला. त्यावर बोलतानाच,  अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी दीपके यांनी केली.  ‘ अजून एक मुद्दा समोर येतोय, असं बोललं जात आहे की,  कॉकरोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येतंय . पण अमित शाह असताना हे शक्य कसं झालं?. हे तर मग अमित शाह यांचं फेल्युअर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येतंय, तर ते गृहमंत्र्यांचं फेल्यूअर आहे’ असं दीपके म्हणाले. ‘ मग तुम्ही चाणक्य कसले. जर बाहेरून फंडिंग येतंय आणि बाहेरून चालवलं जात असेल तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. 20 तारखेला विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं, दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून. ते अमित शाह यांच्या ऑर्डर शिवाय शक्य नाही’, असा आरोप अभिजीत दीपके यांनी केला.

प्रल्हाद जोशींवरही टीकास्त्र

यावेळी त्यांनी नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींवरही निशाणा साधला. ‘ मी त्यांची क्लिप पाहिली. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्याच्या स्वागतासाठी काही तरी बोलले. देशाचा शिक्षण मंत्री हा बलात्काऱ्यांचं स्वागत करतो, त्यांची तारीफ करतो. हे तर म्हणजे प्रधानला काढून आणखी एक विचित्र माणूस बसवलं आहे ‘, अशा शब्दांत दीपके यांनी शिक्षणमंत्र्यावर टीकास्त्र सोडलं. ‘ तुम्ही देशाला काय संदेश देता ?जो शिक्षण मंत्री बलात्काऱ्यांचं स्वागत करणार, त्यांचा सपोर्ट करणार. हे लोकं करणार तरी काय. यांच्या पक्षात सर्व गुंड भरलेले आहेत. कुलदीप सेंगर कोण होता. यांच्या सरकारमध्ये राम रहीम पेरोलवर बाहेर येतात. गुंडांचं समर्थन करणारं हे सरकार आहे,’ असं म्हणत दीपके यांनी सरकारवर हल्ला चढवला.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा