एसटीच्या हाफ तिकीटाचा सुमारे 75 लाख महिलांनी घेतला लाभ, आठवडाभरात 20 कोटीचे उत्पन्न

एसटी महामंडळाचे गाडे घसरले असताना लागोपाठ केलेल्या दोन घोषणा एसटीसाठी फायद्याच्या ठरल्या असेच म्हणावे लागणार आहे.

एसटीच्या हाफ तिकीटाचा सुमारे 75 लाख महिलांनी घेतला लाभ, आठवडाभरात 20 कोटीचे उत्पन्न
अक्कल कोट डेपोमध्ये महीला प्रवाशांची झालेली गर्दी Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 9:14 PM

मुंबई : एसटी महामंडळाने महिलांसाठी अर्धे तिकीट आकारण्याचा निर्णय घेतल्याने लालपरीला महिलांचा प्रतिसाद वाढतच चालला आहे. गेल्या 17 मार्च रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना अर्धे तिकीट आकारण्याची योजना जाहीर केली आणि एका आठवड्यातच एसटीची गंगाजळी 20 कोटींनी वाढली आहे. त्यामुळे ही योजना एसटीला नवसंजीवनी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. एसटी महामंडळाच्या लालपरीतून एका आठवड्यात सुमारे 75 लाख महिला प्रवाशांनी राज्यभरात प्रवास केला आहे.

आधीच तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाला कोरोना काळानंतर आणखीन आर्थिक फटका बसला. त्यामुळे एसटी महामंडळाचे गाडे घसरले असताना लागोपाठ केलेल्या दोन घोषणा एसटीसाठी फायद्याच्या ठरल्या असेच म्हणावे लागणार आहे. एसटी महामंडळाने गेल्यावर्षी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण मोफत प्रवास केल्याने एसटी प्रवासी संख्येत अचानक वाढ झाली. त्यामुळे एसटीने कधीच प्रवास न करणारे नविन प्रवासी एसटीला मिळाले. त्यातच 17 मार्चपासून एसटीने महिलांना अर्धे तिकीट आकारणारी महिला सन्मान योजना जाहीर केली. या योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

एसटीला आठवडाभरात 40 कोटीचा असा लाभ 

राज्यात  एसटीची महिला सन्मान योजना लागू होताच 17 ते 23 मार्च या आठभराच्या काळात जवळपास 76 लाख  3 हजार 322  महीला प्रवाशांनी प्रवास केला आहे. या काळात एसटीला 19 कोटी  78 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. एसटीच्या बसेसमधून 29 समाज घटकांना सवलतीच्या दरात प्रवास करता येत आहे. त्याची प्रतीपूर्ती राज्य सरकार करीत असते. आता अर्ध्या तिकीटातून महीलांना प्रवास करण्याची नव्या सवलतीची भर पडली असून त्याची प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार असल्याने महामंडळाला सुमारे 20 कोटी रूपयाच्या रक्कमेचा वाटा प्रतिपूर्ती म्हणून मिळणार आहे. म्हणजेच एसटीला आठवडाभरात 40 कोटीचा लाभ झाला असे म्हटले जात आहे.

संभाजीनगर विभागातून 11 लाख महिलांचा प्रवास

एसटी महामंडळाच्या संभाजीनगर विभागातून 11 लाख महिलांनी प्रवासाचा लाभ घेतला असून त्याद्वारे 3 कोटी 82 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. तर मुंबई विभागातून 14 लाख 23 हजार 258 महिलांनी प्रवास केला असून 2 कोटी 92 लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर नागपूर विभागातून 8 लाख 73 हजार 680 महीलांनी प्रवास केला असून त्याद्वारे 2 कोटी 24 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

पुणे विभागातून 19 लाख महिलांचा प्रवास

पुणे विभागातून 19 लाख 26 हजार 783  महिलांनी आठवडाभरात प्रवास केला असून 4 कोटी 64 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. नाशिक विभागातून 13 लाख 69 लाख महीलांनी प्रवास करीत 3 कोटी 86  लाखांचे उत्पन्न दिले आहे. तर अमरावती विभागातून 8 लाख 13 हजार 845  महिलांनी प्रवास केला असून 2 कोटी 26 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. असे एकूण राज्यभरात एका आठवड्यातच 76 लाख महिला प्रवाशांच्या संख्येमुळे एकूण 19 कोटी 78 लाखांचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा झाले आहे.

mahila sanman yojana

mahila sanman yojana

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.