तब्बल 25 कोरोनाबाधित महिलांचे सीझेरियन, नागपुरातील डॉक्टर दंदेंचा पुढाकार

राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यातच पहिली लाट अत्यंत भयंकर असल्याने कोरोनाबाधित गर्भवती महिलांची प्रसूती कुठे करायची असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना पडला होता. (above 25 covid positive pregnant women delivery in nagpur)

तब्बल 25 कोरोनाबाधित महिलांचे सीझेरियन, नागपुरातील डॉक्टर दंदेंचा पुढाकार
dr. seema dande
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 11:05 AM

नागपूर: राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यातच पहिली लाट अत्यंत भयंकर असल्याने कोरोनाबाधित गर्भवती महिलांची प्रसूती कुठे करायची असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना पडला होता. मात्र, सरकारी रुग्णालयासोबतच नागपुरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांनी पुढाकार घेऊन या बाधित 25 महिलांची सिझरद्वारे प्रसूती केली. नागपुरात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरने एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसूती करण्याचा हा विक्रम आहे. त्याची दखल युरोपीयन मॅगझिननेही घेतली आहे. सीमा दंदे या देवदूतासारख्या या महिलांसाठी धावून आल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (above 25 covid positive pregnant women delivery in nagpur)

एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना रुग्णालये फुल्ल भरली आहेत. अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ जीवधोक्यात घालून या रुग्णांवर उपचार करत आहेत. पीपीई किट घालून दिवस रात्र या रुग्णांच्या सेवेत हा वैद्यकीय कर्मचारी आहे. नागपुरात 25 हून अधिक कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या कुटुंबीयांपुढेही या महिलांची प्रसूती कुठे करायची हा प्रश्न होता. अनेक दवाखान्यातून या कोरोनाबाधित महिलांची प्रसूती करण्यास नकार मिलत असतानाच सरकारी रुग्णालयाने या महिलांची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्यांना साथ दिली ती खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सीमा दंदे. दंदे यांनी डॉक्टरांची एक टीम तयार करून या महिलांची सीझरद्वारे प्रसूती केली. जीवाची पर्वा न करता त्यांनी केलेल्या या कार्याची युरोपीयन मॅगझीननही दखल घेतली असून त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

दोन लाखांवर कोरोनाबाधित

नागपूरात आतापर्यंत दोन लाखांच्या जवळ कोरोनाबाधीतांचा आकडा पोहोचला. यात गर्भवती महिलांचंही मोठं प्रमाण आहे. कोरोनाबाधीत गर्भवती महिलांच्या प्रसूतीसाठी खाजगी डॅाक्टर्स फारशे पुढ येत नव्हते, अशा स्थितीत आमच्या टीमने 25 पेक्षा जास्त सीझर केल्याचं सीमा दंदे यांनी सांगितलं.

ऑनलाईन ओपीडी सुरू

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशावेळी खासगी आणि सरकारी रुग्णालयात बेड मिळत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. यावर उपाय म्हणून शहरातील काही डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसाठी ऑनलाईन ओपीडी सुरु केलीय. शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांनी कोरोनाबाधित गरोदर महिलांसाठी ऑनलाईन ओपीडी सुरु केली आहे. एखादा व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्यावर नेमकं काय करायचं असा प्रश्न त्याला पडतो. ज्यांना प्रत्यक्ष डॉक्टरांकडे जाणं शक्य नाही. त्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑनलाईन ओपीडीचा चांगला फायदा होत आहे. सध्या कोरोनाच्या संकटात याबाबत जनजागृती करत असल्याचं सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी सांगितलं.

आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ

गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 5 हजार 338 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 3 हजार 868 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीसह नागपूर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता 42 हजार 933 वर जाऊन पोहोचली आहे. (above 25 covid positive pregnant women delivery in nagpur)

संबंधित बातम्या:

दिल्ली-गुजरातपेक्षाही अधिक कोरोनाबळी, नागपुरातील वाढत्या मृत्यूदराची 8 कारणं

राज्यात मर्यादित लॉकडाऊनची चर्चा, “कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय घेणार नाही”-नितीन राऊत

बीकेसीसह मुंबईतील 26 लसीकरण केंद्र बंद; वाचा, सविस्तर लिस्ट

(above 25 covid positive pregnant women delivery in nagpur)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.