भिवंडीत मराठी वाद पेटल्यानंतर अबू आझमी यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले, मी मराठी..
अबू आझमी यांनी मराठीबद्दल अत्यंत धक्कादायक विधान केले. ज्यानंतर मोठा वाद पेटल्याचे बघायला मिळाले. राज्यातील अनेक नेत्यांनी अबू आझमी यांच्यावर जोरदार टीका केली. शेवटी आता त्यांनी मोठी प्रतिक्रिया यावर दिली आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी एक वादग्रस्त विधान केले आणि एकच खळबळ उडाली. यानंतर भाजपा, मनसे आणि शिवसेना यांच्या नेत्यांनी जोरदार विरोध करत अबू आझमी यांच्यावर टीका केली. अबू आझमी यांनी केलेल्या मराठीच्या वक्तव्यावरून वाद चांगलाच पेटल्याचे बघायला मिळतंय. नवनीत राणा यांनी अबू आझमीची चांगलीच कानउघडणी देखील केली. हे भिवंडी आहे, इथे मराठीची काय गरज असेल थेट विधान अबू आझमी यांनी म्हटले होते. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. जवळपास सर्वच स्तरातून अबू आझमी यांच्यावर टीका झाली. सर्वचस्तरातून होणाऱ्या टीकेनंतर अबू आझमी यांनी अत्यंत मोठी प्रतिक्रिया दिलीये.
अबू आझमी म्हणाले की, मी फक्त एकटा मुलाखत देत नव्हतो तर एकावेळी 10 ते 12 पत्रकार उभे होते. जर एक व्यक्ती बोलत असता तर मी त्याला मराठीत बोललो असतो. सर्वजण बोलत होते आणि माझ्याकडे इतका जास्त वेळ नव्हता की, मी सर्वांना बोलू शकेल. मी फक्त इतके म्हणालो की, मराठी ही फक्त महाराष्ट्रापर्यंत जाईल मी जर हिंदीत बोललो तर माझे म्हणणे पूर्ण देशापर्यंत पोहोचेल.
मी तुम्हाला दाखू शकतो की, मी मराठी शिकत आहे आणि मला मराठीवर प्रेम आहे. मी कोणाच्या भीतीने नाही किंवा राजकारणात फायदा मिळवण्यासाठी नाही तर मी या महाराष्ट्रात राहतो तर माझे कर्तव्य आहे की, मी मराठी बोलले पाहिजे. मला खेद वाटतो की, मी अजून मराठी शिकू शकलो नाही. 2009 मध्ये मला खूप भीती घातली होती आणि माझे कपडे देखील फाडले गेले. पण मी मला जे करायचे तेच केले.
पुढे बोलताना अबू आझमी यांनी म्हटले की, जे मराठीबद्दल बोलत आहेत, त्यांनी मराठी शिकण्यासाठी लोकांना प्रेमाने जाऊन पुस्तके वाटली पाहिजेत. क्लासेस सुरू केली पाहिजे, ऑनलाईन शिकवले पाहिजे. तेव्हा मी समजेल की, त्या लोकांना मराठीवर प्रेम आहे. 10 लोक माझ्यासमोर होती, कोणी बोलत होते की, मराठीत बोला कोणी बोलत होते हिंदीत बोला म्हणून मी बोललो की, मी हिंदीत बोललो तर हे संपूर्ण देशापर्यंत पोहोचेल. मी मराठी बोलू शकतो आणि बोललो ना आता असेही त्यांनी म्हटले.
