AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेळघाटात भीषण अपघात, पिकअप 50 फूट दरीत कोसळलं, अनेकांचा मृत्यू

Amravati : मेळघाटातील राणी गाव घाटात मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन पलटी होऊन 50 फूट दरीत कोसळले आहे. या भीषण अपघातात पाच मजूर जागीच ठार झाले आहेत.

मेळघाटात भीषण अपघात, पिकअप 50 फूट दरीत कोसळलं, अनेकांचा मृत्यू
AccidentImage Credit source: Google
| Updated on: Feb 22, 2026 | 10:33 PM
Share

अमरावतीतून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. मेळघाटातील राणी गाव घाटात मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन पलटी होऊन 50 फूट दरीत कोसळले आहे. या भीषण अपघातात पाच मजूर जागीच ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींपैकी अनेकांचा प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील मजूर पिकअप वाहनातून बेलतलाईवरून कंजूली या आपल्या गावी जात होते. या पिकअपमध्ये 20 पेक्षा जास्त मजूर होते. मजुरांना घेऊन जाणारे हे पिकअप वाहन राणी गाव घाटात आले त्यावेळी ते पलटी झाले आणि 50 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अनेकजण गंभीर जखमी

या अपघातात पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. पिकअप दरीत कोसळल्याने 5 जणांना जागीच जीव गमवावा लागला आहे. या अपघात स्थळावरील काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. यात अनेक मृतदेहांचा चेंदामेंदा झाला असल्याचे दिसत आहे. तसेच काही मजूर गंभीर जखमी झालेले दिसत आहेत. या अपघातानंतर परिसरावर शोककळा पसरली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

दरम्यान, राणी गाव घाटात झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. पोलीस आणि स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी मजूरांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या अपघातामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलसांना वाहतूक सुरळित करण्यासाठी मेहनत करावी लागली. दरम्यान या अपघातात 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...