AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार, महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Farmer Loan : राज्यातील काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देत आहेत, आता अशा बँकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार, महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Bavankule and Farmer LoanImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 16, 2026 | 9:58 PM
Share

गेल्या काही काळापासून शेतकरी सतत अडचणीत सापडत आहे, गेल्या वर्षी झालेल्या गारपीटीत शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली होती. मात्र शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज आजही काय आहे. नुकसानीमुळे आधीचे कर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देण्यास काही बँका टाळाटाळ करत आहेत. अशातच आता अशा बँकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमरावतीत आढावा बैठक

राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रासायनिक खते आणि बी बियाणे याचं कसं नियोजन केलेलं आगहे याची माहिती देण्यात आली. यावेळी बावनकुळे यांनी राज्य सरकारकडून अमरावती जिल्ह्याला बी-बियाने आणि रासायनिक खते लागणार आहे त्याचाही पुरवठा केला जाईल अशी माहिती देताना सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर कसा होईल यावर भर दिला.

बँकांवर थेट कारवाई करा

पुढे शेतकऱ्यांना कर्ज बँका टाळाटाळ करत आहेत, यावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटले की, प्राव्हेट आणि नॅशनल बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करत नाही. त्यांना कर्ज देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र ज्या बँका अमरावतीचे पाणी, रस्ते, वीज वापरत आहेत आणि शेतकऱ्यांना कर्ज देत नाही अशा बँकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत. दरम्यान, दर्यापूरमध्ये अनेक कृषी केंद्र लिंकिंग करत आहेत, मात्र लिंकिंग असलेले प्रॉडक्ट दुकानदाराने ठेवायचे नाही अन्यथा दुकानावर कारवाई होईल असे यावेळी बावनकुळे यांनी सांगितलं.

जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बावनकुळे काय म्हणाले?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या घोषणेवर बोलताना म्हटले की, राज्यामध्ये ज्या खऱ्या नोंदी आहेत, ज्या नोंदीमध्ये कुणबी लिहिलेलं आहे त्यांचे सर्व प्रमाणपत्र देण्याचे आदेश आहेत. पण ज्या ठिकाणी खोडतोड करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी काहीच पुरावा नाही असे लोक प्रमाणपत्र मागत असतील तर त्यांना मिळणार नाही. मी मनोज जरांगे यांना विनंती करतोय असं आंदोलन करण्याची गरज नाही. मी महसूलमंत्री म्हणून माझ स्वतः लक्ष आहे. मला सूचना दिल्या आहेत की कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ नये. याचा अर्थ असा नाही की जबरदस्तीने प्रमाणपत्र दिले पाहिजे. प्रमाणपत्र देताना सर्व नियम तपासून द्यावे लागणार आहेत.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?