AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चंद्र कुठे आहे बघून गावातला मुक्काम वाढवला…’; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दरेगाव येथील मुक्कामावरून खोचक टोला लगावला आहे.

'चंद्र कुठे आहे बघून गावातला मुक्काम वाढवला...'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2025 | 4:46 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला वाटतं त्यांनी गावातील मुक्काम वाढवला आहे, तापमान वाढलं आहे, मात्र चंद्र कुठे आहे? ते बघून अजून दोन दिवस ते गावात काढणार आहेत, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे, यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. मला वाटतं त्यांनी गावातील मुक्काम वाढवला आहे, तापमान वाढलं आहे, मात्र चंद्र कुठे आहे? ते बघून अजून दोन दिवस ते गावात काढणार आहेत, असा हल्लाबोल यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान एका मुलाखतीमध्ये बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात मोंठं वक्तव्य केलं होतं. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं, त्यानंतर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे युतीसंदर्भात काही बोलू नका असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत, यावर देखील आदित्य ठाकरे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साद प्रतिसाद आहे पण वाद नाही. दोन पक्षप्रमुख बोलल्यानंतर त्यावर आता कार्यकर्त्यांनी बोलायची गरज नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना रस्ते आणि नालसफाईवरून देखील आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. नालेसफाई झालेली नाही, पण तिजोरी मात्र सफाई झाली आहे. पोईसर नदीचा फोटो समोर आला आहे. मिठी नदी सुद्धा अस्वच्छ आहे, महापालिकेने पावसाळ्यापूर्वी या संदर्भात बैठक घेतली पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.