AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त अंतरवली सराटीच नाही…राज्यात कुठे काय काय करताय मराठा आंदोलक

maratha reservation issue | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथून निघणार आहे. त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून तयारी सुरु आहे. त्याचवेळी राज्यभरातील मराठा बांधव तयारी करत आहे. सरकारला चकवा देण्यासाठी गमिनी काव्याने तीन कोटी मराठा मुंबईत येणार आहेत.

फक्त अंतरवली सराटीच नाही...राज्यात कुठे काय काय करताय मराठा आंदोलक
नगर जिल्ह्यात मराठा आंदोलकांना थांबण्यासाठी दीडशे एकर जमिनीवर व्यवस्था तयार केली जात आहे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 20, 2024 | 9:45 AM
Share

मुंबई, दि.20 जानेवारी 2024 | मुंबईत येण्यासाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज निघणार आहेत. त्यांची आंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. २६ जानेवारी किंवा आजपासूनच ते उपोषण करणार आहे. अंतरवली सराटीतून ते एकटे निघत असून राज्यभरातून कोट्यवधी मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत निघण्यासाठी बीडमधून हजारो मराठा बांधव आंतरवलीकडे रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हजारो मराठे पदयात्रेसाठी निघाले आहेत. आरक्षण घेवूनच आम्ही परतू, असा विश्वास मराठा बांधवांनी यावेळी बोलून व्यक्त केला आहे.

अंतरवली सराटीच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा आंदोलक जिथून बाहेर पडणार त्या ठिकाणी बॅरिकेट लावण्यात येणार आहे. अंतरवली सराटी गावात जाणारी वाहतूक पोलिसांनी वळवली आहे.

धारशिवमधील आंदोलक किराणासोबत घेऊन मुंबईकडे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव तालुक्यातील सांजा येथील शेकडो तरुण मुंबईकडे रवाना झाले आहेत. या तरुणांनी आरक्षण न दिल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एक मराठा लाख मराठा, हम सब जरांगे अशा घोषणा देत भाकरी, रेशन, किराणा असे एक महिन्याचे साहित्य घेत मुंबईकडे रवाना झाले आहे.

अहमदनगर कोपरगावमधील मराठा बांधव रवाना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभर गेल्या अनेक महिन्यांपासून विविध स्वरूपाचे आंदोलने सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर आणि तालुक्यातील हजारो मराठा बांधव देखील आज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. नगर जिल्हयातील सुपा येथे मनोज जरांगे 23 जानेवारी रोजी पोहचणार आहेत. त्यावेळी कोपरगाव तालुक्यातील मराठा बांधव जिवनाश्यक वस्तूंसह आंदोलनात सहभागी होणार आहेत.

मनोज जरांगे यांचा नगर जिल्ह्यात मुक्काम

अहमदनगरला उद्या मनोज जरांगे यांचा मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी यात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेचा दुसरा मुक्काम अहमदनगर शहराशेजारी असलेल्या बाराबाभळी परिसरामध्ये असणार आहे. यामुळे मराठा बांधवांनी बाराबाभळी परिसरात संपूर्ण तयारी केली आहे. जवळपास दीडशे एकरचा परिसर मुक्कामासाठी ठेवला आहे. या परिसरातील साडेचारशे एकरवर पार्किंगची व्यवस्था केली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच