Ahmednagar lockdown : अहमदनगरमधील लॉकडाऊन 5 दिवसांनी वाढवला, आता कडक निर्बंध

अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा पाच दिवसांचा लॉकडाऊन (Ahmednagar lockdown extend) जाहीर करण्यात आला आहे.

Ahmednagar lockdown : अहमदनगरमधील लॉकडाऊन 5 दिवसांनी वाढवला, आता कडक निर्बंध
लॉकडाऊन
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 12:14 PM

अहमदनगर : अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा पाच दिवसांचा लॉकडाऊन (Ahmednagar lockdown extend) जाहीर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त शंकर गोरे (Shankar Gore) यांनी सात दिवसांचे ‘कडक’ ‘लॉकडाऊन’ जाहीर केले होते. त्याची मुदत आज संपल्याने आयुक्तांनी त्याला पुन्हा एकदा पाच दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे नगरमध्ये आता 15 मे पर्यंत लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. किराणा तसेच भाजी विक्रीही बंद राहणार असून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू राहतील.

नगरमधील लॉकडाऊन वाढवला 

अहमदनगर जिल्ह्यात दरोरोज साडेतीन ते चार हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच प्रशासनाने 5 मे ते 10 मेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. तो लॉकडाऊन आता वाढवण्यात आला आहे.

कोरोना रुग्णसंख्या दरोरोज झपाट्याने वाढत असल्या बेडची कमतरता भासत आहे. तर नगरला ऑक्सिजन देखील तुटवडा निर्माण झाला होता, सध्या काही प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता झाली असली तरी कधीही कमी पडू शकतो, त्यासाठी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आला आहे. तर इतर खासगी ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले आहेत.

राज्यातील 17 शहरात लॉकडाऊन 

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. अशावेळी आता जिल्हा पातळीवर लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. काल नाशिक, अमरावती, यवतमाळ, वाशिम, सातारा, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात येत आहे.  महाराष्ट्रातील जवळपास 17 शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या   

राज्यात जिल्हा पातळीवर पुन्हा लॉकडाऊन!, कोणत्या जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?

रुग्णांना मदत करण्यात अपयश आलं, तर रात्र रात्र झोप येत नाही : आमदार निलेश लंके

अनोखी कर्तव्यनिष्ठा, मुलाकडून थेट आईवर कारवाई, अहमदनगरच्या पाथर्डीत नेमकं काय घडलं?

 

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.