मोठी बातमी, अहमदनगर नव्हे, आता अहिल्यानगर, केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी, जिल्ह्याचे नाव बदलले

Ahilyanagar : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामाकरण झाले आहे. गेल्यावर्षी राज्य सरकारने नाव बदलण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्यात आले आहे. नगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर करण्याला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.

मोठी बातमी, अहमदनगर नव्हे, आता अहिल्यानगर, केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी, जिल्ह्याचे नाव बदलले
अहमदनगर नाही अहिल्यानगर
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 5:07 PM

अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामाकरण झाले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल

हे सुद्धा वाचा

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर चढला. गेल्या वर्षी चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. त्यांनी जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव देण्याची घोषणा केली होती.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली.

आज वचनपूर्ती झाली

नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली. आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे महायुती सरकारने दिलेल्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार

अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली होती. त्यानंतर लागलीच येथील रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्याच्या हालचाली झाल्या. एका महिन्यापूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरावर शिक्कामोर्तब होणार हे स्पष्ट झाले होते. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यासंबंधीचे धडाधड निर्णय होत आहेत.

उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.