AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

McDonald च्या पदार्थांतून ‘चीज’ अलविदा! मॅकडोनॉल्ड म्हणते…

McDonald Cheese Items | खवय्यांना मॅकडोनॉल्डने उल्लू बनवल्याचे उघड झाले आहे. चीज न वापरता चीज सदृश्य पदार्थ वापरल्याचे उघड झाल्याने मॅकडोनॉल्डला अन्न आणि औषध प्रशासनाने दणका दिला आहे. नेमकं काय आहे आहे हे प्रकरण? प्रशासनाच्या कारवाईनंतर त्यात बदल करण्यात आला आहे. त्यावर मॅकडोनॉल्डने खुलासा पण केला आहे.

McDonald च्या पदार्थांतून 'चीज' अलविदा! मॅकडोनॉल्ड म्हणते...
| Edited By: | Updated on: Feb 23, 2024 | 10:43 AM
Share

अहमदनगर | 22 February 2024 : खवय्यांचे लाडके ठिकाण म्हणजे मॅकडोनॉल्ड, पण या मॅकडोनॉल्डने ग्राहकांना उल्लू बनवल्याचे समोर आले आहे. मॅकडोनॉल्ड रेस्टॉरंटमध्ये चीजपासून तयार केलेल्या पदार्थांची रेलचेल असते. खवय्ये चीज पदार्थांवर तुटून पडतात. पण मॅकडोनॉल्ड चीज न वापरता, चीज सदृश्य पदार्थ वापरत असल्याचे उघड झाले आहे. अन्न आणि सुरक्षा आयुक्तांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. कंपनीला सर्वच पदार्थांच्या नावातून चीज हा शब्द काढण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. मॅकडोनॉल्डने चीज शब्द काढले असून पदार्थांची नवी नावे जाहीर केली आहेत.

कसा उघड झाला प्रकार

अहमदनगर येथील मॅकडोनॉल्ड रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार उघड झाला होता. विविध पदार्थांमध्ये चीजसदृश्य पदार्थ वापरल्या जात असल्याचे समोर आले होते. अन्न आणि सुरक्षा आयुक्तांनी प्रकरणात रेस्टॉरंटला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तरीही रेस्टॉरंट त्याला जुमानले नाही. त्यानंतर राजेश बढे आणि डॉ.बी.डी. मोरे या अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला. तरीही प्रतिसाद न दिल्याने अखेर पदार्थ विक्री थांबविण्याचा इशारा देण्यात आला.

मॅकडोनॉल्डने केला बदल

कारवाईच्या धास्तीने मॅकडोनॉल्डने आता चीज हा शब्द काढून टाकला. नवीन यादीत पदार्थांसोबत चीज हा शब्द नसेल. मॅकडोनॉल्डची साखळी रेस्टॉरंट चालविणाऱ्या हार्डकॅसल रेस्तराँ प्रायव्हेट लिमिटेडने या पदार्थांची नावे बदलल्याचे पत्र अधिकाऱ्यांना दिले आहे. हा बदल केवळ अहमदनगर पुरताच मर्यादीत नसून कंपनीच्या राज्यातील सर्वच रेस्टॉरंटला लागू झाला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी स्पष्ट केले.

ग्राहकांची फसवणूक

पण आतापर्यंत या कंपनीने ग्राहकांची दिशाभूल केली, त्याविषयी कोण कारवाई करणार हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्राहकांना चीज पदार्थांच्या नावाखाली चीज सदृश्य पदार्थ खाऊ घालणाऱ्या मॅकडोनाल्डवर कडक कारवाईची मागणी होत आहे. ग्राहकांना इतक्या दिवस चूना लावल्याबद्दल मॅकडोनाल्डने साधी दिलगिरी, माफी सुद्धा मागितली नाही, हे विशेष. त्यामुळे याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

मॅकडोनाल्डचा खुलासा काय?

“महाराष्ट्रातील मॅकडोनाल्‍ड्स स्टोअर्समधील आमच्या मेन्‍यूमधून ‘चीज’ हा शब्द काढून टाकल्याच्या अलीकडील अहवालांबाबत आम्ही आमच्या ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमध्ये फक्त शुद्ध (रिअल), दर्जेदार चीज वापरतो. आम्ही या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे काम करत आहोत. आमच्या घटकांमधील पारदर्शकतेप्रती आमची वचनबद्धता आणि आमच्या ग्राहकांना स्वादिष्ट, उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ देण्‍याप्रती समर्पितता अतूट आहे,” असं मॅकडोनाल्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...