याचिका मागे घे नाहीतर ईडी लावेल मागे; आमदारांच्या धमकीने एकच खळबळ

ED | सर्वोच्च न्यायालयातील यचिका मागे घे, नाहीतर ईडी मागे लावेल, अशी धमकी आमदाराने दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोपरगावचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा खोटा आरोप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याचिका मागे घे नाहीतर ईडी लावेल मागे; आमदारांच्या धमकीने एकच खळबळ
शिर्डी साई मंदिर Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 5:52 PM

शिर्डी | 9 March 2024 : शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष तसेच कोपरगावचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे हे वादात अडकले आहेत. त्यांनी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांना सुप्रिम कोर्टातील याचिका मागे घ्यावी यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात येत आहे.जर याचिका मागे घेतली नाही तर इडी मागे लावू , संपवून टाकू अशी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केला आहे. मात्र केवळ मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने आपल्यावर खोटे आरोप करत असल्याचा पलटवार काळे यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण

2021 साली महाविकास आघाडी सरकारने साईमंदिर विश्वस्त आणि अध्यक्षांची निवड केली होती. मात्र या निवडीस हायकोर्टाने स्थगिती दिल्याने तत्कालिन अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह विश्वस्तांनी सुप्रिम कोर्टात तीन याचिका दाखल करत आव्हान दिले आहे.. या प्रकरणाचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता असताना आता अजित पवारांसोबत सत्तेत सामील झाल्याने काळे यांनीच याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप माजी विश्वस्त सुहास आहेर यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

तर ईडी मागे लावू

माजी अध्यक्ष आशुतोष काळे यांनी विश्वस्त सुहास आहेर , सचिन गुजर, अविनाश दंडवते यांना फोन केला. याचिका मागे घेण्यासाठी दबाव टाकत धमकी दिल्याचा आरोप विश्वस्तांनी केला आहे. जर याचिका मागे घेतली नाही तर तुमच्या माघे ईडी लावली जाईल,तुमचे राजकीय भवितव्य धोक्यात आणले जाईल , तुमच्या मागे हात धुऊन लागू अशी धमकी दिल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे.

बदनाम करण्याचा प्रयत्न

साईमंदिराचे माजी अध्यक्ष आशुतोष काळे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. आपण सत्ताधारी पक्षाचा आमदार झाल्याने बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून विश्वस्त मंडळ नाही. सरकारला याप्रकरणी मंडळ नेमता यावे यासाठी आपण याचिका मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.  दरम्यान या आरोपांवरुन एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.