AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : सरकारला ना वेदना, ना पश्चात्ताप… मग यांना काय टाळता येतं?; संजय राऊत यांचा अहमदाबाद अपघातावरून केंद्राला सवाल

एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातात 265जणांचा मृत्यू झाला. संजय राऊत यांनी या घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी अपघाताची जबाबदारी कोण घेणार याबाबत प्रश्न उपस्थित केले. राऊत यांनी विमानाच्या खरेदीसंदर्भातही भाजपवर आक्षेप घेतले. या दुर्घटनेने देशभर हळहळ व्यक्त होत आहे.

Sanjay Raut : सरकारला ना वेदना, ना पश्चात्ताप... मग यांना काय टाळता येतं?; संजय राऊत यांचा अहमदाबाद अपघातावरून केंद्राला सवाल
संजय राऊत यांचा अहमदाबाद अपघातावरून केंद्राला सवाल Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 13, 2025 | 10:46 AM
Share

लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला गुरूवारी दुपारी अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला. एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यावर काही क्षणात विमान खाली आलं आणि नागरी वस्तीतल्या मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं. यामध्ये विमानातील प्रवासी आणि वसतीगृहातील विद्यार्थी अशा एकूण 265 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशासह जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजी वाहिली.

मात्र माध्यमांशी संवाद साधत असतानात राऊत यांनी या घटनेवरून सरकारवरही निशाणा साधला. या अपघातात 241 प्रवासी मृत्यू पावतात, विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळले, त्यातील 24 डॉक्टर आणि मेडिकलचे अनेक विद्यार्थी मृत्यू पावतात. राखरांगोळी होते. मात्र इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. सरकारच्या चेहऱ्यावर दुखाची रेषा, वेदना, पश्चात्ताप दिसत नाही, अशा शब्दांत राऊत यांनी टीका करत केंद्रावर टीका केली.

काय म्हणाले राऊत ?

कालच्या अपघातानंतर संपूर्ण देश शोक मग्न आहे. एअर इंडियाचं विमान कोसळणं ही या देशातील हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. अत्यंत सुरक्षित समजलं जाणारं ड्रीमलाइनर हे टेक ऑफ नंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं आणि त्यातील एक प्रवासी वगळता 241 प्रवासी मृत्यू पावतात. विमान ज्या मेडिकल हॉस्टेलवर कोसळले, त्यातील 24 डॉक्टर आणि मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात. राखरांगोळी होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे माझेही राज्यसभेतील सहकारी होते. त्यांचंही निधन झालं. इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. रेल्वेचे अपघात होत आहेत, पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ल्यात लोक बळी जात आहेत, विमानाचे अपघात होत आहे. पण सरकारच्या चेहऱ्यावर दुखाची रेषा, वेदना, पश्चात्ताप दिसत नाही.

मग यांना टाळता काय येतं?

कालच्या अपघातावर कोणी राजकारण करू नये. मृत पावलेले भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील. ते आपल्या भारतातून एअर इंडियाने प्रवास करत होते, लक्षात घ्या, यात भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली. एअर इंडियाचं खासगीकरण सरकारने केलं आणि टाटाला दिलंय. टाटाने प्रत्येकी एक कोटी दिले म्हणून प्रश्न संपत नाही. इतका मोठा तांत्रिक बिघाड, जे विमान लंडनला चाललंय, दोन्ही इंजिन बंद पडतात, मी त्यातला एक्सपर्ट नाही, दोन्ही इंजिन बंद पडतात. कोणी म्हणतात पक्ष्याची धडक बसली. काही असो. चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर. पण एवढा मोठा अपघात होतो. हा अपघात आहे, अपघात टाळता येत नाही, असं अमित शाह म्हणतात तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे हे दिसतं. रेल्वेचा अपघात टाळता येत नाही, पहलगामचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना टाळता काय येतं? असा सवाल राऊतांनी विचारला.

परत सांगतो आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही. ड्रीमलायनर जेव्हा विकत घेतली तेव्हा त्याच्या खरेदी बाबत, तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भाजपचेच लोकं होते. आपण संसदेतील रेकॉर्ड पाहू शकता. प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मंत्री होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भाजपचे लोकं होते, एवढंच माझ्या स्मरणात आहे.

जबाबदारी कोण घेणार ?

भाजपनेच त्या काळात या ड्रीमलायनरवर आक्षेप घेतला होता. गैरव्यवहार खरेदीत झाला का? दबावाखाली ही खरेदी झाली का असे सवाल भाजपने तेव्हा केले होते. ३०० पेक्षा जास्त लोकांचे प्राण त्यात गेले. म्हणून आम्हाला चिंता वाटते. त्यामुळे प्रश्न उपस्थित करावे लागतात. यात १० ते १२ महाराष्ट्रातील लोक आहेत. जबाबदारी कोण घेणार आहे ? असा सवापही राऊतांनी विचारला.

चौकशी केली पाहिजे

३० सेकंदात विमान कोसळतं. २४२ प्रवाशी आहेत. ३० सेकंदात विमान कोसळतं याचा अर्थ ते विमान उड्डाणासाठी तंत्रज्ञानी त्याला ओके केलं आहे. त्याशिवाय ते लंडनला जाण्यासाठी उडणार नाही. तरीही ३० सेकंदात विमानाची दोन्ही इंजिन बंद पडतात. मग गडबड काय. याची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही राऊतांनी केली.

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.