अजितदादांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या गोटात घडामोंडींना वेग, मोठी बातमी समोर

राज्यात काही ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान झालं आहे, तर काही ठिकाणी येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, मात्र आता त्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

अजितदादांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या गोटात घडामोंडींना वेग, मोठी बातमी समोर
अजित पवार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 10, 2025 | 3:48 PM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या जुन्या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात काही ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींसाठी मतदान झालं आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून त्यानंतर राज्यातल्या काही भागातील नगर परिषद आणि नगर पंचयात निवडणुकींना स्थगिती देण्यात आली आहे, आता निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील उर्वरीत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, सर्वच नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकींची मतमोजणी येत्या 21 डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र आता त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर येत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

ज्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अद्याप मतदान बाकी आहे, अशा नगर परिषदेमध्ये पाथर्डी नगर परिषदेचा देखील समावेश आहे. पार्थी नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भागवत यांनी नगरपरिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. येत्या वीस डिसेंबरला या नगर परिषदेसाठी मतदान होणार होतं, मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतली आहे.  या नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी तिरंगी लढत होणार होती. मात्र आता अजित पवार गटाच्या उमेदवारानं माघारी घेतल्यामुळे इथे दुरंगी लढत होणार आहे.

मोठा ट्विस्ट    

पाथर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 डिसेंबरला मतदान होणार आहे, या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप असा तिरंगी सामना रंगला होता. मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे इथे दुरंगी लढत होणार आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपमध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार? याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.