AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iran war news : अरब देशातील युद्धाचे सावट, गड्या आपला देश बरा, भारतातून गेलेले बडा पगार सोडून मायदेशी येण्यास इच्छुक

आखाती देशातील भडकलेल्या युद्धाने येथे काम करणारे भारतीय चिंतेत सापडले आहेत. कधीकाळी करियरसाठी स्वर्ग मानले जाणारे मध्य पूर्व आता अस्वस्थ आहे. भारतात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या ३० टक्के वाढली आहे.

iran war news : अरब देशातील युद्धाचे सावट, गड्या आपला देश बरा, भारतातून गेलेले बडा पगार सोडून मायदेशी येण्यास इच्छुक
IRAN WAR
| Updated on: Mar 14, 2026 | 4:23 PM
Share

इराणवरील इस्राईल आणि अमेरिकेच्या आक्रमणानंतर इराणने अरब देशातील अमेरिकन तळांना टार्गेट करायला सुरुवात केली होती. यामुळे आखाती देशात आपले करियर करण्यासाठी दशकांहून अधिक काळापासून गेलेले भारतीय आता चिंतेत सापडले आहेत. येथे राहाणे आता सुरक्षित नसल्याने अनेकांनी आपल्या पगारावर पाणी सोडत पुन्हा आपले गड्या आपुला गाव बरा म्हणत भारताची वाट धरली आहे. या तणावपूर्ण वातावरणात कशाची शाश्वती नसल्याने अनेक टॉप एक्झुकेटिव्ह आपल्या प्रदीर्घ करीयर योजनांचा पुनर्विचार करत आहेत. त्यांच्यासाठी आता पहिली प्राथमिकता स्वत:च्या देशात सुखरुप परत येणे ही आहे.

सेफ हेव्हनचा भ्रम तुटला

मध्य पूर्वेतील घडामोडींमुळे येथील शांत आणि स्थिर जीवनाला तडा गेला आहे. देशाच्या प्रमुख एक्झुकेटिव्ह सर्च फर्मचे आकडे या मोठ्या बदलाची साक्ष देत आहेत. गेल्या काही दिवसांआधी गल्फ देशात बसलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी भारतात नोकरी शोधण्यासाठी केलेल्या चौकशीत २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे.

ट्रान्सर्च इंडियाचे मॅनेजिंग पार्टनर अतुल वोहरा यांच्या मते सध्या युद्धाने मध्य पूर्वच्या ‘सेफ हेव्हन’ हा भ्रम नष्ट झाला आहे. लोक आता स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबाच्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड करायला तयार नाहीत. याचे एक अचूक उदाहरण एनर्जी सेक्टरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे आहे. काही काळाआधी त्यांनी भारतात ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’ची नोकरी ठोकरली होती. परंतू युद्ध सुरु होताच त्यांनी स्वत:च रिक्रुटमेट फर्मशी संपर्क केला. या क्षेत्रात आता त्यांना त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित वाटत नाही असे त्यांचे म्हणणे होते. अनेक अन्य एनर्जी कंपन्यांतील टॉप अधिकारी देखील एक त्यांच्या कंपनीच्या भारतीय ऑपरेशन्समध्ये बदली मागत आहेत किंवा बाहेर नोकरी शोधत आहेत.

कतार ते दुबईपर्यंत भीतीचे सावट

इकॉनॉमिक्स टाईम्सच्या बातमीनुसार भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण केवळ एकाच देशापर्यंत मर्यादित नाही. कतारमध्ये एका मल्टीनॅशनल टेक कंपनीत काम करणाऱ्या मिड-लेव्हल प्रोफेशनलने भारतात नोकरी शोधणे सुरु केले आहे. कारण भारतात असलेले त्याचे आई-वडील युद्धाची स्थिती पाहून घाबरले आहे. दुबईत राहाणारे अनेक कुटुंबे चिंतेत आणि काय करावे या विचित्र मनस्थितीत आहेत. येथील सरकारकडून नागरिकांना वारंवार अलर्ट पाठवले जात आहेत की त्यांनी सुरक्षित स्थळी लपावे आणि खिडक्या आणि गॅलरीपासून दूर राहावे.

या मानसिक परिणामावर ईएमए पार्टनर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक के. सुदर्शन यांनीही भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी दुबईतील इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका सावध करणाऱ्या अलर्टनंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. शुक्रवारीच या आर्थिक केंद्रावर इराणी ड्रोनचे अवशेष कोसळले होते. जेव्हा अशा घटना होतात तेव्हा लोकांचा मानसिकतेवर याचा थेट धक्का बसतो. मात्र, अनेक लोकांना आशा आहे की येत्या १० ते १४ दिवसात परिस्थितीत बदल होईल. परंतू सुरक्षे संदर्भात जी भीती बसली आहे ती लवकर बाहेर निघणे कठीण आहे.

भारत आता शानदार पर्याय

अनेकांना भारतात केवळ भीतीमुळे नव्हे तर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीमुळे भारतात आता भविष्य सुरक्षित वाटत आहे. कोर्न फेरी इंडियाच्या फायनान्शियल सर्व्हीसेज हेड लिना राजपूत सांगतात की पारंपारिक रुपाने मध्य पूर्व ती जागा होती जेथे भारतीयांना जायचे होते. परंतू आता हवा बदलत आहे.

वेतनातील हे अंतर आता कमी होतेय

भारत आणि ग्लोबर मार्केटमध्ये सॅलरी पॅकेजमध्ये जमीन आस्मानाचा फरक होता म्हणून आधी भारतीय प्रोफेशनल्स स्वदेश जाण्यास नाखुश असायचे. परंतू वेतनातील हे अंतर आता कमी होत चालले आहे. भारतात आता ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सच्या येण्याने जगभरातील ग्लोबल लीडरशिप रोल्स आता भारतातून ऑपरेट करत आहेत. चांगले सॅलरी पॅकेज आणि देशाच्या आर्थिक प्रगतीने माघारी येण्याचा मार्ग आता खूप आकर्षक झाला आहे. गल्फ देशाची आर्थिक स्थिती जरी चांगली असली तर जीवनाच्या अनिश्चितेने गल्फ ड्रीमला एका नव्या रियालिटी चेक समोर उभे करुन सोडले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल