Ajit Pawar : सावरकर वादावर अजितदादांनी पहिल्यांदाच सोडलं मौन; काय दिलं उत्तर?
महापालिका निवडणुकांच्या प्रचारात अजित पवारांनी सावरकरांवरील आपली भूमिका पहिल्यांदा मांडली. निवडणुकीनंतर यावर विचार स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे अजित पवारांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

महापालिका निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाल अवघा 1 आठवड्याचा कालावधी उरला असून त्याच पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षांचं मिळून महायुतीचं सरकार आहे. मात्र या महापालिक निवडणुकांमध्ये सर्व्तर युती म्हणून न लढता, काठी ठिकाणी हे पक्ष स्वबळावरही लढताना दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपने महत्वाच्या महापालिकेत युती केलेली नाही. दरम्यान मुंबई नंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडची महापालिका ही अत्यंत महत्वाची मानली जात असून तिथे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहेत. त्याच निमित्ताने अजित पवार यांच्या प्रचाराला वेग आला असून त्यांनी दौरे, भेटीगाठी, प्रचार सभा यांचा एकदम सपाटा लावला आहे.
महापालिका निवडणुकांपूर्वी टीव्ही 9 मराठीच्या प्रसिद्ध पत्रकार निखिला म्हात्रे यांनी आज अजित पवारांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांना राज्यातील, राजकारणातील विविध प्रश्न विचारतं बोलतं केलं. त्यातीलच एक प्रश्न होता तो म्हणजे वीर सावरकर यांच्या मुद्याचा. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि अजित पवार यांच्यात कलगीतुरा रंगलेला दिसत असून सत्ताधारी पक्षातीले नेते एकमेकांवर टीका करताना दिसले. त्यातच भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केलेल्या विधानामुळे वा वाद निर्माण झाला होता. युतीत असल्यामुळे अजित पवार यांनादेखील सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील, असे शेलार यांनी म्हटल्याने पेटला आणि तयावरूनच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण गरम आहे.
आज टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीदरम्यान अँकर निखिला म्हात्रे यांनी याच मुद्याचा उल्लेख करत भाजपचा काही दबाव आहे का असा सवाल अजित दादांना विचारला. त्यावर अजित पवार यांनी मौन सोडत थेट उत्तर दिलं.
निवडणूक संपल्यावर मी बोलेन
मी वीर सावरकरांबद्दल कधी काही म्हटलं का? तुमचं तुम्हीच बोलता. आशिष शेलारांनी काय म्हणावं हा त्यांचा मुद्दा. आत्ता माझ्यापुढे निवडणूक महत्वाचा मुद्दा आहे. या निवडणुका संपल्यावर मी त्या ठिकाणी माझी भूमिका मांडेन, मी या मुद्यावर बोलेन असं त्यांनी स्पष्ट केलं. देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे, त्यांचा आदर आपण करतोच. ब्रिटिशांना हाकलून देण्यासाठी चलेजावचा नारा दिला गेला. त्याबद्दल कोणाचं दुमत असल्याचं कारण नाही असं ते म्हणाले.
मी सावरकरांबद्दलचं उत्तर नंतर देईन. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यावर मी याबद्दल बोलेन. आता निवडणुकीत झोकून दिलं आहे. परभणी, सांगली आणि लातूरला जायचं आहे,याबद्दल नंतर बोलू असं म्हणत अजित पवार यांन या विषायवर बोलणं टाळलं. एकूणच निवडणुका झाल्यावर भाजपच्या टीकेचा समाचार घेतला जाईल असा इशारा त्यांनी दिला.
वैचारिक दबाव वाढला तर सत्ता सोडाल?
वैचारिक दबाव वाढला तर सत्ता सोडाल का असा सवालही त्यांना विचारण्यात आला. तेव्हा ‘ वैचारिक दबाव कशाकरता वाढेल आणि काय होईल? आमचं आमचं बरं चाललंय. तुम्ही का दृष्ट लावता आम्हाला? ‘ अशी टिप्पणीही अजित पवार यांनी केली.
