AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचं निधन… विमान मालकाचं म्हणणं काय? काय दिलं कारण?

Ajit Pawar Death in Plane Crash: अजित पवार प्रवास करत असलेले विमान VSR (व्हीएसआर) या खाजगी कंपनीच्या मालकीचे होते. लिअरजेट 45 (Learjet 45) हे या विमानाचे मॉडेल होते. ही विमाने प्रामुख्याने खाजगी प्रवासासाठी वापरली जातात. ते विमान अत्याधुनिक जेट स्वरुपातील होते. VT-SSK असा या विमानाचा नोंदणी क्रमांक होता. या विमानाचे कॅप्टन रोहित सिंग होते.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचं निधन... विमान मालकाचं म्हणणं काय? काय दिलं कारण?
अजित पवार निधनImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 28, 2026 | 4:40 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (२८ जानेवारी २०२६) सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून चार्टर विमानाने निघाले होते. लँडिंगदरम्यान या विमानाचा अपघात झाला आणि स्फोट होऊन विमानाला आग लागली. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला. एकूण पाच जण होते – अजित पवार, त्यांचा सुरक्षा अधिकारी, एक सहकारी आणि दोन क्रू सदस्य (पायलट आणि सह-पायलट). अपघातानंतर विमान कंपनीवर तांत्रिक बिघाड आणि विमानाबाबत गंभीर आरोप होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर विमान चालवणाऱ्या दिल्लीस्थित व्हीएसआर एव्हिएशन (VSR Aviation / VSR Ventures) चे मालक आणि डायरेक्टर व्ही. के. सिंह (विजय कुमार सिंह) यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

विमान पूर्णपणे ठिक होते – कंपनी मालक

व्ही. के. सिंह यांनी माध्यमांशी बोलताना तांत्रिक बिघाडाचा संशय फेटाळला. ते म्हणाले, “आमच्या रेकॉर्ड आणि माहितीनुसार हे विमान (Learjet 45, रजिस्ट्रेशन VT-SSK) १००% सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे फिट होते. उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या आणि चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असावा असे वाटत नाही.”

अपघाताचे संभाव्य कारण?

सिंह यांनी प्राथमिक माहितीवरून हवामानाच्या उल्लेख केला आहे. “लँडिंगच्या वेळी बारामती परिसरात वातावरण स्वच्छ (visibility) नव्हते. धुके किंवा खराब हवामानामुळे पायलटला रनवे नीट दिसला नसावा. वैमानिक अनुभवी होते. मुख्य पायलटकडे १६,००० तासांहून अधिक उड्डाण अनुभव होता आणि सह-पायलटकडेही पुरेसा अनुभव होता. तरीही नेमके कारण DGCA आणि AAIB (Aircraft Accident Investigation Bureau) च्या तपासणीनंतरच समजेल,” असे त्यांनी सांगितले.

DGCA आणि AAIB कडून तपास सुरू

केंद्र सरकारने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, DGCA आणि AAIB कडून सखोल चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. कंपनीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!.
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार.
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत.
अजित पवारांचे निधन; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल
अजित पवारांचे निधन; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल.
अजित पवारांसह विमान अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
अजित पवारांसह विमान अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू.
अजित पवारांच्या विमान अपघाताचे भीषण CCTV फुटेज समोर
अजित पवारांच्या विमान अपघाताचे भीषण CCTV फुटेज समोर.