लेकामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढल्या? अंजली दमानिया यांच्याकडून मोठा दावा, म्हणाल्या, व्यवहार..
पार्थ पवार याच्यावर पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप केली जात आहेत. फक्त आरोपच नाही तर विरोधकांकडून थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात अंजली दमानिय मैदानात उतरल्या असून त्यांनी गंभीर आरोप केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार याच्यावर पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आली. हेच नाही तर विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले. आता अंजली दमानिया चक्क पुण्यातील मुंढवा भागातील ती जमीन बघण्यासाठी पोहोचल्या. मात्र, दमानिया यांना गेटवरच अडवण्यात आले. त्यांना आतमध्ये सोडले नाही. अंजली दमानिया यांनी म्हटले की, गेटवर काही लोक आहेत, त्यांनी मला म्हटले की, आम्ही तुम्हाला बघतो.. तुम्ही चांगले काम करतात. मात्र, जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसणार, तोपर्यंत आम्हाला तुम्हाला आतमध्ये सोडता येणार नाही. आमचे जे डायरेक्टर आहेत, त्यांच्याशी तुम्हाला बोलावे लागेल.
मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी फोनवर संपर्क केला. पण अतिशय उद्धट अशी व्यक्ती मी कधी बघितली नाही. मी त्याला विनंती केली की, आम्हाला फक्त दोनच जणांना आत जाऊन पाहण्याची परवानगी द्या. पण त्यांनी स्पष्टपणे नाकारली. पण आता त्यांना कोणाचे फोन आले. कोणी त्यांना परवानगी देऊ दिली नाही, मला माहिती नाही. पण आता त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय. मी विनंती करूनही त्यांनी मला आत जाऊ दिले नाही.
कोणत्याच समितीला हे नियमात झाले असे म्हणता येणार नाही. सरकारने ही जमीन बोर्डाला रिसर्च करण्यासाठी दिली होती. आताची तेथील परिस्थिती मला बघायची होती. मला आतमधल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची होती. 16 तारखेला काही लोकांनी इथे येऊन तमाशे केली होती. तर ही माणसे कोण होती? याची चाैकशी मला करायची होती. मात्र, मला आत जाण्याची परवानगी नाकारली. केंद्र सरकारचा अधिकारी होता, त्याने माझ्यासोबत अत्यंत वाईट प्रकारे संवाद साधला.
पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, अजित पवार हा व्यवहार रद्द करणारे कोण? अजित पवारांनी राजीनामा द्यावा, असे पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. हा व्यवहार अजित पवार, देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी हे देखील रद्द करू शकत नाहीत. कोणाकडेही ते अधिकारी नाहीत. कारण यात फसवणूक झाली आहे. जर हा व्यवहार रद्द केला तर मी कोर्टात चॅलेंज करेल.
