AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा खैरे कुटुंबावर घाला, आधी पत्नी, मग वकील कन्येचा मृत्यू, आंबेडकरी नेते प्रा. मुकुंद खैरेंचे निधन

अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना प्रा. मुकुंद खैरे यांचे निधन झाले. (Ambedkari Leader Mukund Khaire dies)

कोरोनाचा खैरे कुटुंबावर घाला, आधी पत्नी, मग वकील कन्येचा मृत्यू, आंबेडकरी नेते प्रा. मुकुंद खैरेंचे निधन
कन्या अॅड शताब्दी खैरे, पिता प्रा. मुकुंद खैरे
| Updated on: May 05, 2021 | 12:21 PM
Share

अकोला : समाज क्रांती आघाडीचे प्रमुख प्रा. मुकुंद खैरे (Prof Mukund Khaire) यांचे कोरोनामुळे निधन झाले. खैरेंच्या निधनामुळे आंबेडकरी समाज शोकसागरात बुडाला आहे. दुर्दैव म्हणजे कोरोनाचा संपूर्ण खैरे कुटुंबावरच घाला घातला. त्यांची कन्या ॲड. शताब्दी खैरे (Adv Shatabdi Khaire) आणि पत्नीचेही नुकतेच निधन झाले. (Akola Ambedkari Leader Prof Mukund Khaire dies of COVID after wife daughter Adv Shatabdi Khaire breathes last)

अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना प्रा. मुकुंद खैरे यांची प्राणज्योत मालवली. आंबेडकरी समुदायासाठी हा मोठा हादरा मानला जात आहे. तीन दिवसांपूर्वी अकोल्यात उपचार सुरु असताना त्यांची कन्या ॲड. शताब्दी खैरे यांचेही कोरोनाने निधन झाले होते. तर गेल्या आठवड्यात त्यांच्या पत्नीनेही अखेरचा श्वास घेतला.

कोण होते मुकुंद खैरे?

मुकुंद खैरे हे आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते होते. खैरेंनी 2009 मध्ये अकोल्यातील मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

कोण होत्या शताब्दी खैरे?

मुकुंद खैरे यांच्या कन्या ॲड. शताब्दी खैरे यांचे वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. त्या LLM गोल्ड मेडलिस्ट होत्या. तीन दिवसांपूर्वी अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे तरुण आंबेडकरी समाजाचे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात होती.

शताब्दी खैरे नागपूर उच्च न्यायालयात चार वर्षांपासून कार्यरत होत्या. सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. शताब्दी खैरेंनी बुद्धिस्ट लॉ हे कायदेविषयक पुस्तकही लिहिले होते. आदिवासींच्या शेत जमिनी त्यांच्या नावावर करुन देण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवून सर्वसामान्यांचे अधिकार आणि हक्क कायम ठेवले होते.

बापलेकीचा आंबेडकरी चळवळीत सहभाग

वयाच्या बाराव्या वर्षांपासून शताब्दी खैरे यांनी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी चळवळीत सहभाग घेतला होता. दिल्ली, नागपूर, मुंबई, अकोला, गाझियाबाद, हैदराबादमध्ये कार्यक्रम केले होते. दुर्दैवाने विदर्भात आंबेडकरी चळवळीचा आधार मानल्या जाणाऱ्या खैरे बापलेकीचा कोरोनाने अंत झाला.

संबंधित बातम्या :

आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू, वीस दिवसात वडिलांचं निधन, कोरोनाने कुटुंब संपवलं

ऑक्सिजन बेडअभावी आईने प्राण सोडले, सॅनिटायझर पिऊन लेकीची आत्महत्या

आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू, वीस दिवसात वडिलांचं निधन, कोरोनाने कुटुंब संपवलं

(Akola Ambedkari Leader Prof Mukund Khaire dies of COVID after wife daughter Adv Shatabdi Khaire breathes last)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.