अकोल्यात कोव्हिड वॉर्डमधील रुग्णाची सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या

अकोल्यात कोव्हिड वॉर्डमधील रुग्णाची सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या
सांकेतिक फोटो

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या याचा पुढील तपास सुरू आहे. (Akola Patient commit suicide with saline tube)

Namrata Patil

|

Apr 11, 2021 | 8:28 AM

अकोला : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोल्यातील शासकीय रुग्णालयात वॉर्ड क्रमांक दहामध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे या व्यक्तीला कर्करोगाचीही लागण झाली होती. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. (Akola Corona Negative Patient commit suicide with the help of saline tube)

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह 

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील पातूरमधील रहिवासी असलेल्या 57 वर्षीय रुग्णावर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला कोरोनाची बाधा झाली होती. शनिवारी त्याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याने सलाईनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या केली आहे.

सलाईनच्या नळीने गळा आवळला

तसेच वॉर्डात इतर रुग्णांना काहीही संशय येऊ नये म्हणून त्याने अंगावर चादर घेतली होती. त्यानंतर त्याने सलाईनच्या नळीने गळा आवळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. काही तासानंतर हा प्रकार समोर आल्याने रुग्णालयात खळबळ उडाली.

दरम्यान या रुग्णाने नेमकी आत्महत्या का केली, याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याने कॅन्सरच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे बोललं जात आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या याचा पुढील तपास सुरू आहे.

नागपुरातही सलाईन पाईपच्या मदतीने कोव्हिड रुग्णाचा गळफास

दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये दोन वृद्ध कोरोनाबाधित रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या पैकी एका 81 वर्षीय रुग्णाने तर कोव्हिड वॉर्डच्या बाथरूममध्ये सलाईनच्या पाईपने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर दुसऱ्या घटनेत 68 वर्षीय वृद्धाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

संबंधित कोरोना रुग्ण हा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार घेत होता. त्याने कोविड वॉर्डाचा बाथरूममध्ये सलाईनच्या पाईपसह स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून घेतल्याची सूचना डॉक्टरांना मिळाली होती. डॉक्टरांनी हॉस्पिटल स्टाफच्या मदतीने बाथरुमचे दार तोडले. त्यावेळी तो रुग्ण गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी सलाईन पाईपच्या मदतीने गळफास लावला होता. या घटनेची माहिती समजताच अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला होता.  (Akola Corona Negative Patient commit suicide with the help of saline tube)

संबंधित बातम्या : 

कोव्हिड वॉर्डच्या बाथरुममध्ये सलाईनच्या पाईपने गळफास, दोन बाधितांच्या आत्महत्यांनी शहर हादरलं

रुग्णालयात जाण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नाही, मग ‘या’ नंबर ‘वर कॉल करा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें