अकोल्यात शिवसंपर्क अभियानाचाच फज्जा; या दोन नेत्यांच्या भेटीमुळे शिवसेनेतील वाद चवाट्यावर

खासदार हेमंत पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जात असल्याने गोपीकिशन बाजोरिया आणि खासदार पाटील यांनी भेट घेतली असल्याने या भेटीमागचे राजकारण काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

अकोल्यात शिवसंपर्क अभियानाचाच फज्जा; या दोन नेत्यांच्या भेटीमुळे शिवसेनेतील वाद चवाट्यावर
Akola Shivsena ShivabhiyanImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 7:09 PM

अकोलाः अकोल्यामध्ये शिवसंपर्क अभियान (Shivsmaprk Abhiyan) सुरु होण्यापूर्वीच माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoriya) यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांची भेट घेतली. त्यामुळे या अभियानाची सुरु होण्याआधीच जोरदार चर्चा होत आहे. राजकीय नेत्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे. खासदार हेमंत पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जात असल्याने गोपीकिशन बाजोरिया आणि खासदार पाटील यांनी भेट घेतली असल्याने या भेटीमागचे राजकारण काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत वाद जोरदार सुरु आहेत. त्यामुळे राजकीय कुरघोडीही वाढल्या आहेत. अकोल्यातील शिवसंपर्क अभियानाची तयारी सुरु आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून हे राजकीय वाद टोकाला जात आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत असणारे वाद आता पक्षांतर्गत राहिले नाहीत. त्यातच काही नेत्यांकडून पक्षातील अंतर्गत मतभेद वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालण्याचीही स्पर्धाही सुरु आहे.

वाद चवाट्यावर

शिवसंपर्क अभियान सुरु होण्यापूर्वीच माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी ही भेट घेतली असल्याने आता पुन्हा पक्षातंर्गत असणारा वाद हा चवाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी बाजोरिया यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथेही खासदार अनिल देसाई यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरही परिसरातील शिवसेना कार्यकर्त्यांच्यामध्ये राजकीय चर्चेला उधाण आले होते.

वाद नव्याने उफाळून आले

शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून येत असतानाच राजकीय नेते वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याने हे वाद विकोपाला गेल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळे बाजोरिया आणि हेमंत पाटील यांच्या भेटीवरही अनेक मतमतांतर व्यक्त केली जात आहेत. अकोला विधान परिषद निवडणुकीत गोपीकिशन बाजोरियांच्या पराभवानंतर अकोला शिवसेनेतील मतभेद नव्याने वाद उफाळून आले होते. त्यानंतर आमदार तथा जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांच्या विषयीही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या भेटीने पुन्हा एकदा पक्षात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

पत्रकार परिषदही रद्द

हेमंत पाटील सकाळी 12 वाजता येणार होते त्यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजनही करण्यात आले होते, मात्र हेमंत पाटील यांना यायला उशीर झाल्याने ती पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली. त्यानंतर हेमंत पाटील चार वाजता अकोल्यात दाखल झाले. ते ज्यावेळी शासकीय विश्रामगृहात दाखल झाले त्यावेळी बाजोरिया यांनी हेमंत पाटील यांची भेट घेतली तर शिवसेनेचेच आमदार तथा जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख हे बाळापूर दौऱ्यावर असल्याने या भेटीला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

ED Raid : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला ईडीचा मोठा दणका, ठाण्यातल्या 11 सदनिका सील

काहीही करा झुकणार नाही, Mohit Kamboj यांची मुंबई महापालिकेच्या नोटिशीवर प्रतिक्रिया

‘राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा फायदा घेतेय’, मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर बारणे आक्रमक

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.