Video | संतपाजनक ! अंबरनाथमध्ये रिपोर्टिंग करताना टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीला मारहाण, हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची दादागिरी

अंबरनाथमध्ये रिपोर्टिंग करताना टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीला मारहाण, हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची दादागिरी (Ambernath TV9 Marathi reporter beaten )

  • निनाद करमकर, टीव्ही 9 मराठी, अंबरनाथ
  • Published On - 18:17 PM, 18 Apr 2021
Video | संतपाजनक ! अंबरनाथमध्ये रिपोर्टिंग करताना टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीला मारहाण, हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची दादागिरी
टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीला अशा प्रकारे मारहाण करण्यात आली.

ठाणे : अंबरनाथ येथील एका कोविड हॉस्पीटलमध्ये टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. विजय कोविड हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. रुग्णाचा मृतदेह देण्यास हॉस्पिटल प्रशासनाने नकार देला होता. याच बातमीचं कव्हरेज करण्यासाठी गेले असता टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी निनाद करमकर यांना धक्काबुक्की झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून हॉस्पिटलच्या हेकेखोरपणाचा सर्वत्र निषेध केला जातोय. (Ambernath TV9 Marathi reporter beaten by Vijay Covid Hospital staff)

नेमका प्रकार काय ?

मीरा बनकार नावाच्या बदलापूर येथील एक रुग्ण आहेत. त्यांच्यावर अंबरनाथ येथील एमआयडीसी येथील विजय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना तब्बल दीड लाख रुपयांचं बिल देण्यात आलं होतं. हा खर्च पूर्णपणे  न भरल्यामुळे नातेवाईकांना त्यांचा मृतदेह देण्यास नकार देण्यात आला. हा प्रकार समजल्यानंतर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार घडत असताना पत्रकार त्याचं चित्रिकरण करण्याचा प्रयत्न करत होते. याच वेळी पत्रकारांना डॉक्टरकडून मारहाण करण्याचा प्रकार घडला. यामध्ये टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी निनाद करमकर यांनासुद्धा धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली.

रॅपिंग न करताच मृतदेह दिला

तसेच, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह कोणत्याही रॅपिंगविना नातेवाईकांच्या हवाली केला. हा प्रकार घडल्यानंतर काही वेळानंतर येथे पोलीस आले होते. पोलिसांनी हे प्रकरण पूर्णपणे समजून घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, चित्रिकरण आणि रिपोर्टिंग करण्यासाठी गेलेल्या टीव्ही 9 मराठीच्या पत्रकाराला धक्काबुक्की आणि मारहाण झाल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतोय. तसेच, या प्रकारामुळे विजय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासनाचा निषेधही करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : वाशिममध्ये दिवसभरात 6 जणांचा मृत्यू 474 नवे रुग्ण

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला, सरकारी कामात हस्तक्षेप; दिलीप वळसे-पाटलांनी दिले कारवाईचे संकेत

‘लस’स्वी व्हा आणि 5 हजाराचं बक्षीस जिंका, लसीकरणासाठी सरकारची नामी शक्कल

(Ambernath TV9 Marathi reporter beaten by Vijay Covid Hospital staff)