अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात दुप्पट वाढ, कर्जाच्या रकमेतही वाढ

शिरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या कौटुंबिक संपत्तीत मागील पाच वर्षानंतर दुपटीने वाढ झाली आहे.

अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात दुप्पट वाढ, कर्जाच्या रकमेतही वाढ
खासदार अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 10:06 PM

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत पाच वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. खासदार अमोल कोल्हे हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, प्रत्येक उमेदवाराला अर्ज भरताना त्याच्या संपत्तीची, उत्पन्नाची माहिती देणं अनिवार्य आहे. फक्त उमेदवारच नाही तर उमेदवाराच्या कुटुंबियांच्या नावावरी संपत्ती, उत्पन्न आणि कर्जाची माहिती देणं अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराकडून प्रतिज्ञापत्राद्वारे याबाबत सविस्तर माहिती देण्यात येते. याच प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची संपत्तीत पाच वर्षात दुप्पट वाढ झाली आहे.

शिरूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या कौटुंबिक संपत्तीत मागील पाच वर्षानंतर दुपटीने वाढ झाली आहे. तर कर्जाच्या रकमेतही वाढ झाली असल्याचे त्यांनी नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे. अमोल कोल्हे यांची 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी एकूण संपत्ती ही 4 कोटी 50 लाख रुपये इतकी होती. पण आता ही संपत्ती 8 कोटी 42 लाख रुपये इतकी झाली आहे.

अमोल कोल्हे यांच्याकडे 40 हजार रुपये रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 25 हजार रुपये रोख रक्कम आहे. अमोल कोल्हे यांची ८२ कोटी ३९ लाख ५०५ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर ३ कोटी ६० लाख २५ हजार २३६ रुपयांची स्थावर मातमत्ता आहे. अमोल कोल्हे यांच्या पत्नीकडे ३ कोटी ५१ लाख १३ हजार ५०० रुपयांची मालमत्ता आहे. अमोल कोल्हे यांच्यावर २ कोटी ९९ लाख ६५ हजार ५४२ रुपयांचं कर्ज आहे.

अमोल कोल्हे यांच्या संपत्तीबाबत थोडक्यात माहिती

  • एकूण संपत्ती – ८,४२,००,००० रु. (२०१९ मध्ये ४,५०,००,०००)
  • रोख रक्कम – ४०,००० रु.
  • पत्नीकडे – २५,००० रु.
  • जंगम मालमत्ता – ८२,३९,५०५ रु.
  • स्थावर मालमत्ता – ३,६०,२५,२३६
  • पत्नीकडे – ३,५१,१३५००
  • कर्ज – २,९९,६५,५४२.
  • वाहने – पजेरो चारचाकी, बुलेट-दुचाकी.
  • शेतजमीन – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव (कोल्हेमळा) येथे शेतजमीन.
  • सदनिका (घर) – पुणे जिल्ह्यात नारायणगाव, मुंबईतील परळ-भोईवाडा आणि नाशिकमध्ये देवळाली येथे सदनिका.
Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.