AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लॉगर बनून मैत्री, पिझ्झा डेट अन्… परतवाडा प्रकरणी आरोपीने कसं पसरवलं जाळं? जेलमध्ये गेल्यानंतर इन्स्टाग्रामवर…

परतवाडा येथील धक्कादायक गुन्ह्यातील आरोपी जेलमध्ये गेल्यानंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोशल मीडियाचा वापर करून त्याने कसं जाळं पसरवलं आणि पिझ्झा डेटपासून सुरू झालेला हा प्रवास नेमका कुठे वळला, याचा सविस्तर खुलासा या बातमीत वाचा.

ब्लॉगर बनून मैत्री, पिझ्झा डेट अन्... परतवाडा प्रकरणी आरोपीने कसं पसरवलं जाळं? जेलमध्ये गेल्यानंतर इन्स्टाग्रामवर...
amravati paratwada
| Updated on: Apr 19, 2026 | 9:58 AM
Share

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि परतवाडा शहरांना हादरवून टाकणाऱ्या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडीओ प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर समाजात संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र तो ट्रेंडींगमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

६ दिवसांत ४ हजार नवे फॉलोअर्स

आरोपी अयान अहमद हा सोशल मीडियावर स्वतःला एक मोठा ब्लॉगर म्हणून मिरवत असे. धक्कादायक बाब म्हणजे, त्याच्या अटकेनंतर आणि गुन्ह्याचे गांभीर्य समोर आल्यानंतर त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये मोठी घट होण्याऐवजी वाढ झाली आहे. अयान अहमदचे गुन्हा दाखल होण्यापूर्वी १८ हजार फॉलोअर्स होते. यानंतर आता ६ दिवसात म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे २२ हजार फॉलोअर्स झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा दिवसांत हजारो लोकांनी त्याचे प्रोफाईल सर्च केले आहे. एखादा गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशा प्रकारे सोशल मीडियावर चर्चेत येणे हे समाजाच्या बदलत्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे होत आहेत. यासोबतच पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अयान अहमद हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याने अनेक तरुणी त्याच्याकडे आकर्षित व्हायच्या. तो ब्लॉगर असल्याने नवीन मुलींशी ओळख करणे त्याला सोपे जात असे. पीडित ८ तरुणींव्यतिरिक्त त्याचे अनेक मुलींशी मैत्रीचे संबंध असल्याचे समोर आले आहे. या मैत्रीचा फायदा घेऊन त्याने काही मुलींचे शोषण केले का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

पोलिसांकडून घटनास्थळांचा पंचनामा

परतवाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास अधिक गंभीरपणे केला जात आहे. आरोपी अयान अहमद हा पीडित मुलींना जिथे जिथे घेऊन गेला, त्या सर्व ठिकाणी पोलीस त्याला सोबत घेऊन जात आहेत. त्या ठिकाणी त्याची चौकशी केली जात आहे. परतवाडा शहरातील प्रसिद्ध कॅफे पिझ्झा हबमध्ये आरोपीने तरुणींना नेल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी तिथे नेऊन सविस्तर चौकशी आणि पंचनामा केला. तसेच अश्लील व्हिडिओ नेमके कुठे चित्रित केले गेले आणि ते कोणाकोणाला पाठवण्यात आले, याचा तांत्रिक तपास सायबर सेलच्या मदतीने सुरू आहे.

आतापर्यंतची कारवाई

या रॅकेटमध्ये अयान अहमदसह इतरही अनेकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत एकूण ८ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. १० हून अधिक जणांची चौकशी पूर्ण झाली असून, आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता आणखी एक पीडित तरुणी समोर आली असून, पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. अमरावतीच्या या प्रकरणाने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक