AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडूंना सहकार विभागाचा दणका, आमदारकीनंतर ‘हे’ पद धोक्यात

आता बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बच्चू कडूंना सहकार विभागाचा दणका, आमदारकीनंतर 'हे' पद धोक्यात
bacchu kadu
| Updated on: Feb 09, 2025 | 8:36 AM
Share

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. अमरावतीच्या जिल्हा बँकेतील विरोधी गटातील संचालकांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर त्याला पदावर राहता येत नाही, अशी तरतूद जिल्हा बँकेच्या उपविधीत करण्यात आली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अमरावती जिल्हा बँकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष

बच्चू कडू यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. बच्चू कडू यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर आता बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बच्चू कडू यांना नुकतंच सहकार विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. बच्चू कडू यांनी बबलू देशमुख गटातील तीन संचालक फोडत 11 संचालकांच्या जोरावर बबलू देशमुख यांना जिल्हा बँकेतील सत्तेपासून रोखले होते. त्यानंतर अमरावती जिल्हा बँकेतील सत्ताधारी आणि विरोधक असा तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे.

बच्चू कडू संचालक पदासाठी अपात्र

त्यातच आता अमरावती येथील विभागीय निबंधक सहकारी संस्था यांनी विरोधकांच्या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांना चांगलं खडसावलं होतं. जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 12 संचालकांनी सहकार विभागाकडे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत विभागीय निबंधक सहकारी संस्था प्रवीण फडनीस यांनी बच्चू कडूंना नोटीस पाठवली आहे. यात थेट बच्चू कडू संचालक पदासाठी अपात्र ठरत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तुम्हाला संचालक पदावरून निलंबित का करण्यात येऊ नये, असा सवालही उपस्थित केला आहे.

बच्चू कडूंना ‘हे’ प्रकरण भोवणार

बच्चू कडू यांच्यावर 2017 मध्ये नाशिकमधील सुकरवाडा पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणि मारहाण करण्यासंदर्भात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी नाशिकच्या विशेष न्यायालयाने 2021 मध्ये त्यांना एक वर्षापर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणाचा दाखला देत विरोधी गटातील बारा संचालकांनी बच्चू कडूना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

15 दिवसात तुमचं म्हणणं मांडा, बच्चू कडूंना आदेश

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमाप्रमाणे संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंत शिक्षा सुनावली असेल तर अशा संचालकांना बँकेच्या पदावर राहता येत नाही, असा नियम आहे. या नियमानुसार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद अपात्र ठरत आहे, असा दावा विरोधकांनी केला आहे. याबद्दल बच्चू कडू यांना पंधरा दिवसात तुमचे म्हणणं विभागीय सहनिबंधकांकडे मांडावे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.