अमरावती हिंसाचारः माजी मंत्री अनिल बोंडेंसह भाजप नेत्यांना अटक, पालकमंत्र्यांचा इशारा, दंगल घडवणाऱ्यांना सोडणार नाही!

अमरावतीत दहशत माजवणाऱ्यांना आता सोडणार नाही, असा सूचक इशारा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. तसेच रविवार आणि सोमवारी अमरावतीत कोणत्याही प्रकारचे हिंसक कृत्य घडलेले नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

अमरावती हिंसाचारः माजी मंत्री अनिल बोंडेंसह भाजप नेत्यांना अटक, पालकमंत्र्यांचा इशारा, दंगल घडवणाऱ्यांना सोडणार नाही!
दंगल घडवणाऱ्यांना सोडणार नाही- अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 5:58 PM

अमरावतीः त्रिपुरा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही अमरावतीत दिसून आले. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि जोडफोड करण्यात आली. त्यामुळे जवळपास दोन दिवस अमरावती शहरात प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. हा जनक्षोभ उसळवण्यासाठी जबाबदार असलेल्या भाजप नेत्यांची पोलिसांकडून झाडाझडती घेतली जात आहे. काही जणांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान ही दंगल घडवण्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही, अशा इशारा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

अमरावतीत दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही- यशोमती ठाकूर

दोन दिवस अमरावतीत दहशत माजवणाऱ्यांना आता सोडणार नाही, असा सूचक इशारा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. तसेच रविवार आणि सोमवारी अमरावतीत कोणत्याही प्रकारचे हिंसक कृत्य घडलेले नाही. शहरात संचारबंदी असून नागरिकांना दुपारी 2 ते 4 या वेळेत मूलभूत सुविधांसाठी बाहेर पडण्याची परवानगी आहे. लवकरच शहरातील वातावरण पूर्वपदावर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शहरात सध्या 4 ते 5 हजार पोलीस तसेच राज्य राखीव दलदेखील बंदोबस्तासाठी तैनात आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

काय घडलं होतं अमरावतीत?

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी अमरावतीl मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. या हिंसक कारवायांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरातीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले. यातदेखील भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. त्यामुळे शनिनारी 1 वाजेपासून अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच शहरात 3 दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना अटक

या दंगल प्रकरणी आज सकाळपासून अमरावती बंद मध्ये सहभागी झालेल्या भाजप नेत्यांच्या अटकेला सुरुवात झाली. यात भाजपच्या अनेक नेत्यांच्या घरांची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनाही सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. तसेच अन्य 50 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. हिंसाचार प्रकरणी 15 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आले.

ज्यांच्या घरी तलवारी आहे, त्यांची झडती घ्या- बोंडे

दरम्यान, अटक झाल्यानंतर माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी हिंदू मार खाणार नाही. ज्यांच्या घरात खरोखरच्या तलवारी आहेत, त्यांची झाडाझडती घेऊन दाखवा, असे आवाहनही त्यांनी पोलीस आणि अमरावती प्रशासनाला दिले.

इतर बातम्या-

..तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, आशिष शेलारांचा नवाब मलिकांना इशारा

बंगळुरातल्या कृषी मेळाव्यात दांडग्या ‘कृष्णा’ची कमाल, 1 कोटींच्या बोलीने मालक मालामाल, देशी गोवंशाची किंमत डोकं चक्रावणारी!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.