“संजय राऊत ज्या राष्ट्रवादीची स्तुती करतात, त्याच राष्ट्रवादीचे तुकडे ते पाडणार”; भाजप नेत्याची राऊतांवर सडकून टीका

एकीकडे ते राष्ट्रवादीची स्तुती करतात तर दुसरीकडे संजय राऊत हे फोडाफोडीचे काम करत असतात त्यामुळे त्यांच्याकडून राष्ट्रवादीलाही ते फोडण्याचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

 संजय राऊत ज्या राष्ट्रवादीची स्तुती करतात, त्याच राष्ट्रवादीचे तुकडे ते पाडणार; भाजप नेत्याची राऊतांवर सडकून टीका
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 4:46 PM

अमरावती : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे 16 आमदार अपात्र होत असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर वेळोवेळी सामना या वृत्तापत्रातून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल कलेला जात आहे. त्यावरून आता राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. खासदार संजय राऊत यांनी 16 आमदार अपात्र होत असल्याचे सांगितल्यानंतर आता या वादात भाजपने उडी घेतली आहे. त्यावरूनच भाजपकडूनही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

याविषयी अनिल बोंडे यांनी बोलताना सांगितले की, कोण सांगत आहे 16 आमदार अपात्र होत आहेत, अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल लिक होत असतात का असा प्रतिसवालही खासदार अनिल बोंडे यांनी उपस्थित केले आहेत.

अपात्र आमदारांच्या मुद्यावरून त्यांना घेरले असतानाच आता राष्ट्रवादीची स्तुती संजय राऊत यांनी केल्यामुळे त्यावरूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या वादात आता भाजपच्या अनिल बोंडे यांनी उडी घेतल्याने हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सामनाच्या आजच्या अग्रलेखात संजय राऊत हे तोंड फाटेपर्यंत राष्ट्रवादीची स्तुती करत होते.त्याच राष्ट्रवादीचे तुकडे पाडण्यासाठी संजय राऊत अग्रलेख लिहत आहेत अशा शब्दात अनिल बोंडे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या जाहीर केल्यानंतर त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यावरून सामना वृत्तपत्राने अग्रलेख लिहिताच अनिल बोंडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांनाही टार्गेट केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम संजय राऊत करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणावरूनच त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरूनही संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात आले आहे. अपात्र आमदारांचा विषय न्यायालयीन कक्षेत असल्याने हे आमदार अपात्र होणार नसल्यामुळेच त्याची सर्वाधिक अस्वस्थता ही महाविकास आघाडीतच असल्याचे सांगत मविआच्या मित्र पक्षांचीही त्यांनी खिल्ली उडवली आहे.

एकीकडे ते राष्ट्रवादीची स्तुती करतात तर दुसरीकडे संजय राऊत हे फोडाफोडीचे काम करत असतात त्यामुळे त्यांच्याकडून राष्ट्रवादीलाही ते फोडण्याचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.